Mayani  esakal
सातारा

साताऱ्यात बेवारस मृतदेहाचे कुत्र्यांनी तोडले लचके

अजय यांचा मृत्यू नेमका कशाने? तर्कवितर्कांना उधाण

संजय जगताप

मायणी (सातारा) : मोराळे-औंध रोडवर (Morale-Aundh Road) मायणी हद्दीत यलमर वस्तीनजीक रस्त्याच्या बाजूला एक बेवारस मृतदेह आढळून आला आहे. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच मायणी पोलिस (Mayani Police), पोलिस पाटील प्रशांत कोळी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी प्राथमिक चौकशी करून मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला.

मोराळे-औंध रोडवर मायणी हद्दीत यलमर वस्तीनजीक रस्त्याच्या बाजूला एक बेवारस मृतदेह आढळून आला आहे.

दरम्यान, मोराळेचे सरपंच संदीप शिंदे यांनाही घटनास्थळी बोलाविण्यात आले. त्यांनी अंदाज बांधला व मयताच्या आईला तेथे नेण्यात आले. आईने मृतदेह ओळखला असून तो अजय सर्जेराव शिंदे (वय ३५, रा. मोराळे, ता. खटाव) या तरुणाचा असल्याचे स्पष्ट झालेय. या मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडले आहेत. त्यामुळे प्रथमदर्शनी तो ओळखता आला नाही. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत असून अजय यांचा मृत्यू नेमका कशाने झाला? याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलेय. अजय यांचा नेमका घात झाला की अपघात याबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी सातारा शहरातील काही नागरिकांचे पिसाळेल्या कुत्र्याने लचके तोडले होते, त्यामुळे अजय यांना देखील कुत्र्यानेच चावा तर घेतला नसावा?, अशीही शक्यता उपस्थित केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT