फलटण शहर (सातारा) : फलटण तालुका (Phaltan Taluka) हा रब्बीचा तालुका असला तरी गेल्या काही वर्षात निसर्गचित्र व ऋतुचक्रार बदलत आहे. सध्या बहुतांश ठिकाणी पावसाचे (Rain) प्रमाण कमी-अधिक असल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची (Kharif Sowing) घाई न करता जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा झाल्यानंतर वापसा लक्षात घेऊन पेरणी करावी, असे आवाहन करताना अपुऱ्या ओलाव्यावर केलेल्या पेरणीनंतर पावसात खंड पडल्यास पेरणी वाया जाण्याचा धोका असल्याने वापसा पाहूनच पेरणी करावी. त्यामुळे पावसात खंड पडला तरी जमिनीतील ओलाव्यामुळे पेरणी वाया जाण्याचा धोका कमी असल्याचे कृषी विभागाने (Department of Agriculture) स्पष्ट केले आहे. (Department Of Agriculture Instructs Farmers Not To Sow Kharif Seasonal Crops Due To Insufficient Rainfall)
फलटण भागात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये परतीचा मॉन्सून बरसतो. त्या अनुषंगाने सन २०२१-२०२२ या वर्षातील शेती उत्पादनवाढीच्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजनपूर्वक खरीप पेरणीच्यादृष्टीने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
फलटण भागात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये परतीचा मॉन्सून (Monsoon) बरसतो. त्या अनुषंगाने सन २०२१-२०२२ या वर्षातील शेती उत्पादनवाढीच्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजनपूर्वक खरीप पेरणीच्यादृष्टीने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. खरीप पिकांच्या वाढीसाठी जून ते सप्टेंबर या कालावधीत उपयुक्त असा पाऊस पडतो. त्यामुळे पिकांच्या वाढीचा काळ आणि हंगामातील दर आठवड्याला पडणारा पाऊस यावर उत्पादन अवलंबून असते. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता कापूस, सोयाबीन, बाजरी, मका, तूर, भुईमूग आदी पिकांच्या पेरणीपूर्व तयारीची कामे करावीत, जमिनीच्या प्रकारानुसार योग्य जमिनीची निवड करून त्याप्रमाणे पीकनिहाय पूर्व मशागतीची कामे करावीत, असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग (Agriculture Officer Suhas Ransingh) यांनी केले आहे.
खरीप हंगामातील (Kharif season) सोयाबीन प्रमुख पीक गणले जाऊ लागले आहे. त्याच्या उत्पादनवाढीसाठी खात्रीशीर बियाणे खरेदी करावे, बियाण्याचा तुटवडा भासल्यास शक्यतो घरचेच बियाणे उगवण क्षमता तपासून वापरावे, ७० टक्केपेक्षा जास्त उगवण क्षमता असणारे बियाणेच पेरणीसाठी उपयुक्त असल्याने त्याचाच वापर करावा, असे आवाहन करताना पेरणीपूर्वी बियाण्यास प्रतिकिलो तीन ग्रॅम थायरम किंवा ट्रायकोडर्मा चार ग्रॅम या प्रमाणात रासायनिक बीजप्रक्रिया करून त्यानंतर रायझोबियम आणि पीएसबी या जिवाणू संवर्धकांची प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम किंवा दहा मिलि या प्रमाणात प्रक्रिया करून पेरावे तसेच पेरणीवेळी प्रति हेक्टरी ३० किलोग्रॅम नत्र, ६० किलोग्रॅम स्फुरद, ३० किलोग्रॅम पालाश खते द्यावीत.
सोयाबीनची पेरणी शक्यतो वापसा परिस्थितीत करावी, पेरणी करताना बियाणे पाच सेंटीमीटरपेक्षा खोल पेरणी होणार नाही याची दक्षता घ्यावी किंवा बीबीएफद्वारे पेरणी करावी तसेच मका व बाजरी पिकांची पेरणी करताना अझेटोबॅक्टर /ऍझोस्पिरियम व पीएसबी या जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करून वापसा परिस्थितीत पेरणी करावी, जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया केल्यामुळे २० ते २५ टक्के नत्र खतांची बचत होऊन उत्पादनात दहा टक्के वाढ होते. सोयाबीन व बाजरी पिकांची पेरणी बीबीएफद्वारे केल्याने हवा खेळती राहते, कोरडवाहू क्षेत्रात फायदेशीर बियाणे कमी लागते. बियाण्याबरोबर खते दिली जातात, पावसाचा खंड पडला तरी ओलावा टिकून राहतो आणि जास्त पाऊस झाला तरी जास्तीचे पाणी सऱ्यांमधून निघून जाते. खरीप हंगामामध्ये दहा टक्के रासायनिक खतांची बचत मोहिमेंतर्गत बीजप्रक्रिया, हिरवळीच्या खतांचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर, जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खतांचा वापर यामुळे खतांची बचत, उत्पादन खर्चात बचत आणि एकरी उत्पादन वाढ शक्य असल्याचे रणसिंग यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
Department Of Agriculture Instructs Farmers Not To Sow Kharif Seasonal Crops Due To Insufficient Rainfall
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.