महाबळेश्वर (सातारा) : विरोधकांमुळे शहराच्या विकासकामांना (Developmentwork) खीळ बसल्याचा आरोप करणाऱ्या बालिश बुध्दीच्या कुमार शिंदे (Corporator Kumar Shinde) यांची किव येते. असे आरोप करण्यापूर्वी आत्मपरीक्षण केले असते, तर अशी निरर्थक बडबड केली नसती. मागील चार वर्षांत शहराचा कोणता विकास केला, असा सवाल उपनगराध्यक्ष अफजल सुतार व त्यांचे सहकारी नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. (Deputy Mayor Afzal Sutar Criticizes Corporator Kumar Shinde At Mahabaleshwar)
नगरसेवक कुमार शिंदे यांनी केलेले आरोप विरोधी गटातील नगरसेवकांनी फेटाळले.
नगरसेवक कुमार शिंदे यांनी केलेले आरोप विरोधी गटातील नगरसेवकांनी फेटाळले. ते म्हणाले, की नगराध्यक्षा व त्यांचे पती यांनी सहकारी नगरसेवकांना कधीही विश्वासात घेतले नाही. कायम मनमानी कारभार केला. सर्वसाधारण सभेपूर्वी सहकारी नगरसेवक आपल्या प्रभागातील विकासकामांची यादी नगराध्यक्षांना देत असे. परंतु, ते विषय कधीच नगराध्यक्षा व त्यांचे पती कुमार शिंदे यांनी विषयपत्रिकेत घेतले नाहीत. सहकारी नगरसेवकांच्या कामांना बगल देऊन स्वतःच्या आर्थिक फायद्याचे विषय फक्त घेतले जात होते.
आमच्यावर विकासकामे रोखून धरल्याचा आरोप करणाऱ्यांनी प्रथम आत्मपरीक्षण करावे. गेले काही महिने नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या द्विसदस्य समितीच कामकाज पाहात आहे. मुख्याधिकारी यांनी गवळी आळी येथील भुयारी वीज वाहिनीचे कामाच्या निविदेस मंजुरी दिली. परंतु, नगराध्यक्षांनी या कामाला अद्याप मंजुरी दिली नाही. का तर ते काम उपनगराध्यक्षांच्या प्रभागातील आहे म्हणून अशी अनेक उदाहरणे देता येतील. म्हणून कुमार शिंदे यांनी आत्मपरीक्षण केले असते तर अशा प्रकारे आरोप करून शहरवासीयांची दिशाभूल करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती, असेही उपनगराध्यक्ष सुतार यांनी स्पष्ट केले.
Deputy Mayor Afzal Sutar Criticizes Corporator Kumar Shinde At Mahabaleshwar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.