लोणंद - धनगर आरक्षणाची अंमलबजावणी होण्यासाठी राज्याकडून केंद्राकडे धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्तीची शिफारस त्वरीत पाठवावी. या मागणीसाठी लोणंद येथे गेली १६ दिवस उपोषणास बसलेले गणेश केसकर यांची मागणी त्वरित मान्य करावी व त्यांना पाठींबा दर्शवण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने आज (ता. १) हजारोंच्या संख्येने महिला व नागरीक मेंढया, घोडयांसह पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पारगाव खंडाळा येथे येवून खंबाटकी घाट आडवत तब्बल साडेचार तास रास्तो रोखो आंदोलन छेडले.
त्यामुळे महामार्गावरील वाहातूक साडेचार तास ठप्प झाली होती. वहानचालक व प्रवाशांना मोठी रखडपट्टी सोसावी लागली. पुणे बाजूकडे शिवापूर टोलनाका तर सातारा बाजूकडे सुरुर फाटा पर्यंत वाहाणांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान पोलिस व प्रशासनाच्या वतीने आंदोलन मागे घेण्यांची विनंती धुडकावून लावत अंदोलकां सांयकाळी पाच वाजल्यानंतरही रस्त्यावरच ठिय्या मांडून रास्ता रोखो आंदोलन सुरूच ठेवले होते. मुख्यमंत्री अथवा त्यांचे प्रतिनिधी यांनी दुरूस्तीची शिफारस पाठवल्या खेरीज रास्ता रोखो अंदोलनावर अंदोलक ठाम आहेत.
धनगर आरक्षणाची अमंलबजावनी होण्यासाठी राज्याकडून केंद्राकडे धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्तीची शिफारस त्वरीत पाठवावी. या मागणीसाठी लोणंद येथे गेली १६ दिवस गणेश केसकर उपोषण सुरू आहे. खंडाळा तालुका धनगर आरक्षण कृती समीतीच्या वतीने आज पारगाव-खंडाळा येथे खांबाटकी घाट आडवून पुणे -बंगळूर राष्ट्रीय माहामार्गावर रास्ता रोखो आंदोलन करण्याच्या दिलेल्या इशाऱ्यानुसार आज हे रास्ता रोखो अंदोलन छेडण्यात येत आहेत.
आज सकाळी खंडाळा येथील शिवाजी चौकात हजारोंच्या संख्येने जमून धनगर बांधवांनी खंडाळा शहरातून मोर्चाने पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पारगाव खंडाळा येथे येवून ठिय्या मांडून रस्ता रोखो आंदोलन छेडले. त्यावेळी धनगर नेते आमदार गोपीचंद पडळकर, डॉ. शशिकांत तरंगे, घनशाम हाके, प्रियादर्शनी कोकरे, माजी सभापती रमेश धायगुडे-पाटील, सोनाली राहुल धायगुडे, विदया सुनिल शेळके, सुप्रिया बाळासो शेळके, हणमंतराव शेळके, हर्षवर्धन शेळके, बाळासो शेळके, अॅड. वैभव धायगुडे, अॅड. सचिन धायगुडे, अशोक धायगुडे आदींची भाषणे झाली.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, धनगर आरक्षणांसाठी धनगर समाज बांधवांची न्यायालयीन व स्त्यावरील लढाई सुरू आहे. शासनाने धनगर समाजाचा अंत पाहू नये, लवकरात लवकर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी. अन्यथा मुंबईकडे जाणारे सर्व रस्ते बंद करू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आपले खरे साहेब आहेत.
खंबाटकी घाटाला बी. के. कोकरे यांचे नाव दयावे. तसेच राज्याच्या वतीने आरक्षण समिती गठीत केली आहे त्या समीतीत साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा समावेश करावा. यावेळी जेष्ठ नेते आनंदराव शेळके-पाटील, नानासो देवकाते, राजेंद्र धायगुडे, विनोद क्षीरसागर धनगर समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलिस उपअधिक्षक राहुल धस यांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी आंदोलक आणि पोलिस यांच्यात वारंवार बाचाबाची झाली.
दरम्यान, गणेश केसकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचे गणेश केसकर यांनी स्वतः आंदोलकांना फोन वरून ध्वनीक्षेपाद्वारे सांगीतल्यावर आंदोलकांनी साडेपाच वाजता तब्बल साडेचार तासांनी रास्ता रोखो आंदोलन मागे घेतले. त्यानंतर या मार्गावरील वाहातूक सुरू झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.