सातारा

केवळ पदावर आहे म्हणून प्रभाकर घार्गे, मनोज घोरपडेंना बळीचा बकरा करू नका : माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर

आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : साखर चोरी प्रकरणातील संशयितास मारहाण करण्याच्या प्रकाराचे आपण समर्थन करणार नाही. मात्र, या प्रकरणी केवळ पदावर आहे म्हणून प्रभाकर घार्गे, मनोज घोरपडेंना बळीचा बकरा करू नये. त्यांच्याबाबत पोलिस यंत्रणेने योग्य ती चौकशी करून गुन्ह्यांबाबत फेरविचार करावा असेही माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी नमूद केले.

माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी वडूज येथे पत्रकार परिषद घेतली हाेती. कृष्णा-भीमा स्थिरीकरण बोगदा व शेतकरी तसेच सर्वसामान्य ग्राहकांना आलेल्या वाढीव वीजबिलाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा येळगावकर यांनी दिला. यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांनी त्यांनी उत्तर दिले. त्यावेळी डॉ. हेमंत पेठे, उद्योजक जीवनशेठ पुकळे, पेडगावचे माजी सरपंच अंकुशराव दबडे, प्रा. अजय शेटे, अशोक काळे, सुरेश माने, सुयोग शेटे, बापूराव काळे उपस्थित होते. 

टोलचे भूत मानगुटीवरून उतरणार कधी?; उदयनराजेंसह महाविकास आघाडीतील नेत्यांची भूमिका ठरणार महत्त्वाची!

एका प्रश्नावर माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर म्हणाले साखर चोरी प्रकरणातील संशयितास मारहाण करण्याच्या प्रकाराचे आपण समर्थन करणार नाही. मात्र, या प्रकरणी केवळ पदावर आहे म्हणून प्रभाकर घार्गे, मनोज घोरपडेंना बळीचा बकरा करू नये. त्यांच्याबाबत पोलिस यंत्रणेने योग्य ती चौकशी करून गुन्ह्यांबाबत फेरविचार करावा.

असे आहे पडळचे प्रकरण

पडळ (ता. खटाव) येथील खटाव- माण ग्रो प्रोसेस कारखान्यातील वरिष्ठ अधिकारी जगदीप धोंडिराम थोरात (वय ४०, रा. गोवारे, ता. कऱ्हाड) यांच्या संशयित मृत्यूप्रकरणी कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार प्रभाकर घार्गे, को चेअरमन मनोज घोरपडे, कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांच्यासह अन्य आठ व अनोळखी १२ जणांवर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

मृत जगदीप थोरात यांना साखरेची अफरातफर केल्याच्या कारणावरून जनरल मॅनेजर यांनी ऑफिसमध्ये बोलावून घेऊन बुधवारी (ता. १० मार्च) सायंकाळी साडेपाच ते आठ वाजण्याच्या दरम्यान फायबर काठी, लाकडी काठी, ऊस व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

मात्र, त्या ठिकाणी त्यांचा गुरुवारी (ता. ११) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्यानंतर विक्रम आकाराम पाटील (रा. कापूसखेड, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी दिलेल्या माहितीवरून कऱ्हाड पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक भरत तुकाराम पाटील यांनी थोरात यांच्या मृत्यू प्रकरणी माजी आमदार घार्गे, मनोज घोरपडे, संग्राम घोरपडे, संचालक महेश घार्गे, शेडगे (मामा), सनी क्षीरसागर, पी. ए. अंजनकुमार, अशोक नलवडे आदींसह अन्य दहा ते बारा जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. 

पुणे- मुंबईला जाणा-या प्रवाशांनाे! एसटी महामंडळाने घेतला महत्वपुर्ण निर्णय

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT