सातारा : जुलै अखेर उलटत आला तरी, पावसाने दडी दिल्याने बळीराजा चिंतेत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र, तदनंतर पावसाने केवळ उघडीप दिल्याने पिकांना याचा फटका बसला. यंदा समाधानकारक पाऊस होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने यापूर्वीच दिले होते. मात्र, ऐनवेळी पावसाने दडी दिल्याने शेतक-यांची पुरती निराशा झाली आहे.
माण तालुक्यात कोरोनाचे शतक
हवामान खात्याने जुनच्या पहिल्या आठवड्यातच शुभ संकेत देत शेतक-यांना काही अंशी दिलासा दिला होता, त्यामुळे शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी करत भरघोस पीक काढण्याचे योजिले होते. मात्र, ऐनवेळी पावसाने दडी दिल्याने शेतक-याचा हंगामी मेळ विस्कटला आहे. जिल्ह्यात जुलै अखेर 4932.92 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सातारा तालुक्यात 332.03 मिलीमीटर, जावलीत 577.86, पाटणमध्ये 529.32, कराडला 263.85, कोरेगावात 228.89, खटावमध्ये 244.50, माणला 209.00, फलटणमध्ये 215.00, खंडाळ्यात 173.35, वाईत 315.20 तसेच महाबळेश्वरमध्ये 1843.93 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.
कोरोनामुळे मी बंदीस्त झाले आहे, तुम्ही स्वत: ला सांभाळा
जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातून बाहेर पडताच उदयनराजे म्हणाले, ते सहमत आहेत
सातारा जिल्ह्यात अपेक्षीत इतका पाऊस न झाल्याने पिकांवर मोठे संकट ओढवले असून पीक वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या जिल्ह्यात भात, ज्वारी, ऊस, स्ट्रॉबेरी, घेवडा इत्यादी मुख्य पीकं घेतली जातात, परंतु पावसाने दडी दिल्याने या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. आज संपूर्ण जिल्ह्यावर कोरोनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे, त्यातच वरुणराजाने शेतक-यांना निराश केल्याने शेतकरी पुरता खचून गेला आहे. आज घडीला जिल्ह्यात पावसाचे प्रमाण पाहिले असता, एकदम जेमतेम असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. पाऊस नसल्याने पीकं वाळून जात आहेत, तर पिकांवर किडीचा प्रादुर्भावही वाढला आहे, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. कृषी विभागही कोरोनाच्या कामात व्यस्त असल्याने बी-बियाणे, औषध मिळण्यास दिरंगाई होत असून शेतक-यांची परवड होत आहे, त्यातच बदलत्या हवामानाचा देखील पिकांना फटका बसत असून पीकं कुजून जात आहेत. जिल्ह्यातील कोयना, कण्हेर, धोम, उरमोडी या धरणांत पुरेसा पाणीसाठा असला, तरी शेतक-यांना याचा कितपत लाभ होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संपादन : संजय शिंदे
व्वा... या हॉस्पिटमध्ये 392 कोरोना बाधितांवर मोफत उपचार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.