सातारा

गुन्हेगारी माेडीत काढणे हेच माझे ध्येय : आंचल दलाल

उमेश बांबरे

सातारा : ऐतिहासिक व क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यात काम करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. येथील नागरिक शांतताप्रिय असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यास पोलिसांना चांगल्या प्रकारे मदत करतात. त्यामुळे मी साताऱ्यात अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकणार आहे, असा विश्वास साताऱ्याच्या पोलिस उपअधीक्षक आंचल दलाल यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची बहिण असलेल्या आंचल दलाल यांनी नुकताच सातारा उपविभागाचा पदभार स्वीकारला आहे. यानिमित्त त्यांच्याशी " सकाळ'च्या प्रतिनिधीने साधलेला संवाद.
 
तुमचे बंधू आयएएस अधिकारी असून, ते सध्या जिल्हाधिकारी आहेत. तुम्हाला आयपीएस होण्यासाठी त्यांच्याकडून काही मार्गदर्शन मिळाले का? 

आंचल दलाल : आयपीएसच्या परीक्षेसाठी मला माझ्या भावाची खूप मदत झाली. सर्वात जास्त जनरल नॉलेजची माहिती त्यांच्याकडून मिळाली, तसेच मुलाखतीसाठी कोणता अभ्यास करायचा, कोणती माहिती असायला हवी हे त्यांनीच सांगितले होते. माझे सर्व शिक्षण ऍकॅडमीत झालेले आहे. कोलकता येथील राष्ट्रीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतलेली आहे. त्यामुळे लोकांना न्याय देणे आणि गुन्हेगारांना रोखण्यासाठी माझ्या शिक्षणाचा उपयोग होईल, या उद्देशाने मी आयपीएस केडर निवडले. या क्षेत्रातच मी अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकते. 

साता-याच्या जिल्हाधिका-यांनी डायलिसिसच्या रुग्णांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय 

आयपीएस प्रशिक्षणादरम्यान, तुम्हाला उत्कृष्ट महिला अधिकारी हा पुरस्कार मिळालेला आहे, याविषयी काय सांगाल? 

दलाल : शालेय जीवनापासून मला क्रीडा क्षेत्राची खूप आवड आहे. मी बास्केटबॉल, बॅडमिटनची खेळाडू असून, यामध्ये मी माझे कौशल्य सिद्ध केलेले आहे. त्यामुळे आयपीएसच्या प्रशिक्षणादरम्यान, लांबपल्याची मैदानी स्पर्धा, पोहण्याची स्पर्धा आणि घोडेस्वारीमध्ये उत्कृष्ट काम केल्याने मला पुरस्कार मिळाला. याच धर्तीवर मला उत्कृष्ट महिला अधिकारी पुरस्कारही मिळालेला आहे. 

पाच जिल्ह्यांच्या एसपींना साताऱ्यात आयजींचा कानमंत्र!

तुम्ही आयपीएससाठी महाराष्ट्र केडर का निवडले?
 
दलाल : देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील जनतेत नैसर्गिकरीत्या कायद्याचे पालन करण्याची जाणीव आहे. कायदा- सुव्यवस्था राखण्यात नागरिक पोलिसांना सहकार्य करतात. कायद्यासोबतच न्याय व्यवस्थेवर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे. कायद्याच्या चाकोरीत वावरण्यात येथील नागरिकांचा कल आहे. ही बाब पूर्वेकडील राज्यात जाणवत नाही. सातारा ऐतिहासिक व क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. त्यामुळे सातारा शहरात काम करणे आनंददायी आहे. 

"सवयभान" चा "सातारी पॅटर्न" देशाला ठरला दिशादर्शक : राजेंद्र चोरगे

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक, युवतींना काय सांगाल? 

दलाल : आयएएस परीक्षा म्हणजे मॅरेथॉनसारखी आहे. या स्पर्धेसाठी अभ्यासात सातत्य पाहिजे. तुमची कष्ट करण्याची तयारी असल्यास तुम्ही यशस्वी होऊ शकता. स्मार्ट ऍण्ड हार्डवर्कची आवश्‍यकता आहे. 

पुस्तके उपलब्ध करणार... 

सातारा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात स्पर्धा परीक्षेशी संबंधित भरपूर पुस्तके उपलब्ध आहेत. ही पुस्तके मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवक, युवतींसाठी उपलब्ध करू शकते. त्यासाठी त्यांनी आमच्या कार्यालयात येऊन पुस्तकांची मागणी करावी. मी त्यांना ही पुस्तके उपलब्ध करून देईन, असेही त्यांनी सांगितले. 

Edited By : Siddharth Latkar
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 1st Test: नाद खुळा... जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखाली भारताने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत सिंबा देतोय कॅन्सरशी झुंज ; मालिकेतील ट्विस्टमुळे प्रेक्षकांच्याही डोळ्यात आलं पाणी

Kolhapur: पक्ष बदलूनही अपयश आलेल्या नेत्यांची वाटचाल कशी राहणार? वेगळा विचार करण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही!

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT