Elections will be contested on lotus symbol Shivendra Singh Raje Bhosale sakal
सातारा

निवडणुका कमळ चिन्हावरच लढवणार

शिवेंद्रसिंहराजे भोसले; जावळीत पंचायत समिती व जिल्हा परिषदेविषयी मोठी घोषणा

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ - ‘मी ज्या पक्षात काम केले, तेथे पक्षाशी प्रामाणिक राहूनच पक्षवाढीसाठी योगदान दिले, मी भाजप पक्षाचा आमदार असून येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका भाजप पक्षाच्या कमळ या चिन्हावरच लढवल्या जातील, त्यादृष्टीने भाजप पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. भाजपची धेय-धोरणे प्रत्येक बुथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व कार्यकर्त्यांनी तळागाळात पोचवावीत,’ असे आवाहन सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. करहर (ता. जावळी) येथे भाजपच्या वतीने ‘मन की बात’ या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

शिवेंद्रसिंहराजे म्‍हणाले, ‘भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षात असून, येत्या १३ ते १५ ऑगस्टपर्यंत घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. तसेच कुठेही तिरंगा झेंडा कमी पडणार नाही, याची काळजी घ्यावी. पदाधिकाऱ्यांनी कसलीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करावा.’ भाजप तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे म्हणाले, ‘प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ''मन की बात'' या कार्यक्रमाचे आयोजन जावळी तालुक्यात करण्यात आले आहे. पक्षवाढीसाठी आमदार भोसले यांच्या मार्गदर्शनासाठी सर्व पदाधिकारी जोमाने काम करतील व आगामी निवडणुकांत भाजपच्या विजयासाठी प्रयत्नशील राहतील. यावेळी करहर विभागातील आशा सेविका तसेच करहर विभागातील विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. आशा सेविकांच्या मानधनवाढीसाठी ताकदीने प्रयत्न करणार असल्याचे आशा स्वयंसेविकांच्या शिष्टमंडळास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आश्वासन दिले.

तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांनी प्रस्तावना मांडली तर माजी उपसभापती रवींद्र परामणे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रमोद शिंदे, उपाध्यक्ष किरण भिलारे, प्रदीप बेलोशे, अविनाश पवार, दीपक गावडे, भाईजी गावडे, संजय बिरामणे, राजेंद्र गोळे, गोरख महाडिक, देवेंद्र राजपुरे, मोनिका परामणे, पिंपळीच्या माजी सरपंच निलीमा पवार तसेच पौर्णिमा गोळे, मंगल पांगारे, अरुणा शिर्के, वर्षा भिसे, कल्पना इंदलकर, मोनाली नवसरे, वैशाली तरडे, मीनाक्षी नवसरे, राणी परामणे आदी सेविका उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT