सातारा

"माझी आई काळुबाई' चित्रिकरणाची चाैकशी हाेणार ?

उमेश बांबरे

सातारा : "माझी आई काळुबाई' या मालिकेच्या चित्रिकरणास जिल्हा प्रशासनाने जुलैमध्ये काही अटी व शर्तीवर परवानगी दिली होती. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर एका गाण्याच्या चित्रिकरणासाठी मुंबईहून 22 कलाकार आणण्यात आले होते. तोपर्यंत या चित्रिकरण परिसरात कोरोनाचा संसर्ग नव्हता. यापूर्वी या मालिकेतील सर्व कलाकारांची तपासणी करूनच परवानगी दिली होती. मात्र, त्यानंतर बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या कलाकारांमुळे मालिकेतील तब्बल 22 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचा आज (मंगळवार) काेराेनामुळे मृत्यू झाला. सध्यस्थितीत चित्रिकरणास आलेल्या कलाकारांची तपासणी का केली गेली नाही, असा प्रश्‍न हिंगणगावचे ग्रामस्थ व कोरोना समिती सदस्यांनी उपस्थित केला आहे.
 
"माझी आई काळुबाई' या मालिकेचे हिंगणगाव (ता. फलटण) येथे सुरू असलेल्या शुटिंगमधील कलाकारांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्या साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये पाच दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होत्या. आज (मंगळवार) पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. जिल्हा प्रशासनाने या मालिकेच्या चित्रीकरणास काही अटींवर जुलैमध्ये परवानगी दिली होती. या अटी व शर्तींमध्ये 60 वर्षांवरील कोणत्याही कलाकाराला चित्रीकरणात सहभागी होता येणार नाही. बाहेरच्या हायरिस्क मधील कलाकार जिल्ह्यात आणता येणार नाहीत. तसेच सोशल डिस्टिसिंगचे पालन करावे. शुटींगच्या दरम्यान संसर्ग होऊ नये, यासाठी मास्क, सॅनिटायझर व इतर उपाय योजना कराव्यात. कलाकारांना राहण्याच्या ठिकाणीही सोशल डिस्टसिंगचे पालन करावे, सर्वांच्या कोरोना चाचणी कराव्यात, आदींचा यामध्ये समावेश होता.

जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन
 
सुरवातीला चित्रीकरणासाठी आलेल्या कलाकारांची कोरोनाची चाचणी झाली होती. त्यामुळे सुरवातीच्या काळात चित्रीकरण चांगल्या प्रकारे सुरू होते. मात्र, मालिकेतील एका गाण्याच्या चित्रिकरणासाठी मुंबईहून 22 कलाकार आणण्यात आले होते. ते चित्रिकरणाच्या ठिकाणी आल्यावर त्यांची कोरोना चाचणी करणे, काही लक्षणे असल्यास त्यांना होम क्वारंटाइन करणे आदी बाबींचा समावेश होता. मात्र, यापैकी कोणतीही गोष्ट झाली नाही. मालिका व्यवस्थापन पातळीवरून याबाबी गांभीर्याने घेतल्या नाहीत. परिणामी कोरोनाचा शिरकाव सेटवरील 22 कलाकारांना झाला. आता प्रशासकिय अधिकारी मात्र, मालिका व्यवस्थापनाने बाहेरून कलाकार आणल्यानंतर कोरोनासंदर्भातील शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नसल्याचे सांगत आहेत. पण या कलाकारांची तपासणी कोणी करायची हा प्रश्‍नही यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. 

मार्गदर्शक तत्वे पालन केले का, याची चौकशी होणार... 

कोविडच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आम्ही त्यांना चित्रिकरणास परवानगी दिली होती. मात्र, तेथे कोरोनाचा संसर्ग होऊन एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन झाले आहे. चित्रिकरणादरम्यान, शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन झाले नव्हते का, याची आम्ही माहिती घेणार आहोत असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ई - सकाळशी बाेलताना नमूद केले.

आशालता वाबगावकर यांचा गायिका ते नायिका एक यशस्वी जीवनप्रवास 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Result: अजितदादांचा आनंद द्विगणित! पुण्यातील आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? 'या' तीन नावांची चर्चा

IND vs AUS : Yashasvi Jaiswal च्या दीडशतकी खेळीने रचला नवा विक्रम ; दिग्गजांमध्ये स्थान मिळवणारा पहिला भारतीय

Adampur Firing : भरदिवसा दोन टोळ्यांमध्ये गोळीबारचा थरार; एकमेकांवर झाडल्या गोळ्या, आदमापुरात नेमकं काय घडलं?

Girish Mahajan : गिरीश महाजन ठरले पुन्हा संकट मोचक; बंडखोरी थोपविण्यात यश

Nashik East Assembly Constituency : बालेकिल्ला शाबूत, ढिकलेच ‘पहिलवान’

SCROLL FOR NEXT