Manshi Kanase esakal
सातारा

पती, सासू-सासऱ्यांचं ऐकून शेतकरी महिला बनली 100 गाईंची पालक

अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (सातारा) : शेणोली (ता. कऱ्हाड) येथील शेतकरी महिला उद्योजिका मानसी कणसे (Farmer Women Entrepreneur Manshi Kanase) यांनी तीन वर्षांपूर्वी शेतीपूरक देशी खिलार व गीर गाईंचा (Gir cow) गोपालन व्यवसाय धुंडाळला. त्यांच्याकडे लहान व मोठ्या १०० गाई आहेत. त्यातून दूध, तूप व गोमूत्र निर्मिती होते. यांसह २५ एकर शेतीला शेण व गोमूत्राची स्लरी, गांडूळखत तसेच व्हर्मिवॉशचा पुरवठा झाल्याने शेतीतील रासायनिक खतांचा वापर जवळजवळ नाहिसा होत आला आहे. त्यामुळे त्यांची शेती विषमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. (Farmer Women Manshi Kanase Became Guardians Of 100 Cows bam92)

घरी पती, सासू व सासरे यांच्यातील दैनंदिन शेतीतील चर्चा ऐकून मानसी कणसे यांची शेतीमधील आत्मियता वाढली.

घरी पती, सासू व सासरे यांच्यातील दैनंदिन शेतीतील चर्चा ऐकून सौ. कणसे यांची शेतीमधील आत्मियता वाढली. त्यांनी शेती व शेतीपूरक व्यवसायात लक्ष द्यायचे ठरवले. शेतीत पारंपरिक ऊसशेती होती. सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांनी तीन वासरे व गाईंचे पालन केले. त्यानंतर गुजरातमधून २५ गाई खरेदी केल्या. त्यात अनेकांनी भाकड, वयस्कर खिलार गाई आणून दिल्या. त्यांचाही सांभाळ करताना त्यांना पशुखाद्य कमी देत खुराकही दिला. दररोज गाई जवळच्या डोंगरात चरायला सोडल्या जातात. त्यामुळे त्यांच्या खाण्यात विविधता येते. नैसर्गिकरित्या गाई दूध देतात. घरी शेतीचा वारसा आहे. मात्र, किडीमुळे शेती धोक्यात आल्याने त्या गोपालनकडे वळल्या.

दररोज ५० लिटर दूध उत्पादित होते. दुधाची प्रतिलिटर ८० रुपयाने विक्री होते. दुधाचा तूपनिर्मितीसाठी उपयोग करतात. उत्पादित तूप ‘यशोहिरा’नावाच्या ब्रॅंडने (Yashohira Project) तीन हजार रुपये दराने विक्री होते. एकरात गोपालनसहित कोंबडीपालनात २०० कोंबड्या आहेत. शेण व गोमुत्राचे एका टाकीत कुजवन करून ते पाटपाण्याने शेतात सोडतात. गांडूळ खताची निर्मिती केली जाते. २५ एकर शेतीत केवळ औषध म्हणून रासायनिक खते वापरली जातात. जवळजवळ ८० टक्के रासायनिक खते कमी आहेत.

शेतकरी असल्याने घर आणि शेती हे वेगळे न मानता त्या दोन्ही गोष्टी एकरूप आहेत, हे मनात ठेवले. घरामध्ये पती, सासू व सासरे यांचा दररोज होणारा शेतीविषयक संवाद मला व्यवसाय सांभाळण्यास अधिक उपयोगी ठरत आहे.

-मानसी कणसे

Farmer Women Manshi Kanase Became Guardians Of 100 Cows bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT