Statement Sakal
सातारा

जमिनीच्या मोबदल्यासाठी पश्चिम सुपनेतील शेतकरी आक्रमक

टेंभू उपसा जलसिंचन योजनेंतर्गत सुपने व पश्चिम सुपने येथील कोयना नदीकाठावरील शेतकऱ्यांची जमीन बाधित झाली आहे.

हेमंत पवार

कऱ्हाड - टेंभू उपसा जलसिंचन योजनेने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला ताबडतोब मिळावा, या मागणीचे निवेदन सुपने, पश्चिम सुपने येथील शेतकऱ्यांनी टेंभू योजनेचे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. वाय. रेड्डीयार, प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देऊन केली.

निवेदनातील माहिती अशी, टेंभू उपसा जलसिंचन योजनेंतर्गत सुपने व पश्चिम सुपने येथील कोयना नदीकाठावरील शेतकऱ्यांची जमीन बाधित झाली आहे. त्या जमिनीचा शासकीय मोबदला देण्यासाठी २०११ रोजी शासकीय अधिकाऱ्यांकडून रीतसर मोजणी व बाधित जमिनीचा सर्व्हे झाला आहे. मात्र, दहा वर्षे उलटूनही अद्याप बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. गेल्या वर्षी प्रशासनाने बाधित शेतकऱ्यांकडून संमतीपत्रे घेऊन जमीन खरेदीची कारवाई सुरू केली. मात्र, काही जमीनधारक शेतकऱ्यांना कागदोपत्री अडचणी येत असल्याने ही प्रक्रिया ठप्प झाली आहे. परिणामी ज्या शेतकऱ्यांची कागदोपत्री पूर्तता झाली आहे, त्यांनाही नाहक प्रशासकीय अडचणीमुळे त्यांच्या हक्काचे जमीन मोबदल्यापासून वंचित राहावे लागले आहे.

प्रशासनाने ही प्रक्रिया गतीने राबवण्यासाठी ताबडतोब कागदोपत्री त्रुटी दूर करून वंचित शेतकऱ्यांना जमीन मोबदला देण्याची कारवाई करावी. ज्यांची कागदोपत्री पूर्तता पूर्ण झाली आहे, त्यांना प्राधान्याने जमीन मोबदला देण्यासाठी ताबडतोब पावले उचलावीत. अन्यथा टेंभू योजनेच्या प्रशासनाविरुद्ध असहकार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे शेतकरी शिवाजी पाटील, सुहास पाटील, विश्वजित थोरात, अर्जुन कळंबे, दीपक गायकवाड, रामचंद्र गायकवाड, सुरेश गायकवाड, दिलीप थोरात, मंगेश गायकवाड, भगवान गायकवाड, जनार्दन थोरात, हिंमत गायकवाड, सुभाष कोळी, अनिल साळुंखे, नामदेव जाधव, यांच्यासह सुपने पश्चिम सुपनेचे शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT