फलटण (जि. सातारा) : न्यू फलटण शुगर कारखान्याकडे माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचे सहा कोटी रुपये थकीत आहेत. कारखाना प्रशासनाने त्वरित शेतकऱ्यांचे थकीत बिल अदा करावे, अन्यथा ता. 12 सप्टेंबरला कारखान्याच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी दिला आहे.
यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवराज पुकळे, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते मगन काळे, समाधान काळे, आहिल पठाण, सुमित मोरे, "स्वाभिमानी'चे सोलापूर जिल्हा प्रसिद्धिप्रमुख श्रीनिवास कदम पाटील उपस्थित होते. माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील नेते व कण्हेरचे माजी सरपंच भरतबापू माने यांच्या पुढाकाराने थकीत शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक झाली होती.
या बैठकीत थकीत बिलासंबंधी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार महामुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या शिष्टमंडळाने कारखाना प्रशासनाला निवेदन दिले. या निवेदनाच्या प्रती फलटणचे तहसीलदार, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात देण्यात आल्या आहेत. आगामी आंदोलनाची रणनीतीही ता. 12 रोजी ठरणार आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.