Popatrao narbat and Vishwas narbat Sakal
सातारा

बोलेरो गाडीच्या धडकेत पिता-पुत्राचा दुर्दैवी अंत

अज्ञात बोलेरो गाडीने जोरदार धडक दिल्याने पिता पुत्राचा अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

सल्लाउद्दीन चोपदार

अज्ञात बोलेरो गाडीने जोरदार धडक दिल्याने पिता पुत्राचा अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

म्हसवड - नरबटवाडी (ढाकणी) येथील सामाजिक कार्यकर्ते पोपटराव नरबट व त्यांचा मुलगा विश्वास नरबट यांच्या दुचाकीला ढाकणी फाट्यावर अज्ञात बोलेरो गाडीने (Bolero vehicle) जोरदार धडक (Accident) दिल्याने पिता पुत्राचा अंत (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, पिता पुत्रावर एकाच सरणावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबतीत अधिक माहिती अशी, पोपट तातोबा नरबट (वय ५२) व त्यांचा मुलगा विश्वास पोपट नरबट (वय १३) दोघे रा. नरबटवाडी (ता. माण) हे काल सायंकाळी दुचाकीवरून म्हसवड-मायणी रस्त्याने म्हसवड कडून मायणीच्या दिशेने निघाले होते. ढाकणी फाटा येथे उसाने भरलेली ट्रॉली रस्त्याच्या कडेला उभी होती. यास ट्रॅक्टर जोडलेला न्हवता. रस्त्यावर उभ्या असलेल्या या ट्रॉलीला दुचाकी पास करत असताना समोरुन येणा-या पांढ-या रंगाचे बोलेरो गाडीवरील चालकाने जोराची धडक दिली. धडकेनंतर बोलेरो गाडी न थांबता निघुन गेली. या धडकेमध्ये दुचाकीवरील विश्वास पोपट नरबट यास जोराचा मार बसल्याने तो जागीच ठार झाला. तर त्याचे वडील पोपट तातोबा नरबट हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी अकलूज येथे नेत असताना त्यांचे रस्त्यातच निधन झाले. या घटनेची फिर्याद मयत पोपट तातोबा नरबट याचा चुलत भाऊ सुरेश मारुती नरबट (वय ३८) रा. नरबटवाडी (ता. माण) यांनी दिली असून, या फिर्यादीमध्ये त्यांनी ट्रॅक्टर मालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व हलगरजेपणाने ट्रॉली (मुंगळा/अंगत) रस्त्यावर उभी केल्याने तसेच पांढ-या रंगाची बोलेरो गाडीवरील चालक यांनी धडक दिल्याने मुलगा व वडील यांचे मृत्यूस कारणीभूत असल्याचे नमूद करून त्यांचे विरोधात तक्रार दिली आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते पोपट नरबट हे सामाजिक कार्यात हिरेरिने सहभाग घेत असत नरबटवाडी येथे अद्ययावत वाचनालय उभे करण्यात मोलाचे योगदान दिले असून, प्राथमिक शाळा ही तालुक्यातील एक आदर्श शाळा बनवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पत्नी आशा वर्कर म्हणून शासकिय आरोग्य विभागात काम करत असताना कोरोना काळात पत्नी बरोबर ढाकणी नरबटवाडी येथे फ्रंटलाईन वर्कर म्हणून प्रामाणिकपणे काम केले आहे.

मंगळवारी (ता. २) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ढाकणी येथे मुलगा विश्वास यास वह्या आणण्यासाठी गेले असता, काळाने त्यांच्यावर झडप घातली. अपघातानंतर मुलगा निपचित पडून आहे. हे लक्षात येताच मुलासाठी वडिल गंभीर जखमी असतानाही अरे कुणीतरी माझ्या मुलाला वाचवा असा टाहो फोडत होते. यावेळी उपस्थितांचे काळीज पिळवटून जात होते. याप्रसंगी ढाकणी येथील धिरज सरतापे यांनी प्राथमिक मदत मिळावी म्हणून खुप प्रयत्न केले. शेवटी पोपटराव नरबट यांच्या वर काळाने घाला घातल्याने दोघाही पिता पुत्रावर नरबटवाडी येथे एकाच सरणावर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला असून, या घटनेने ढाकणी नरबटवाडी सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेचा अधिक तपास म्हसवड पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT