सातारा

साताऱ्यातील कोरोनाच्या उपाययोजनांसाठी 52 कोटींचा निधी

उमेश बांबरे

सातारा : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णांना व्हेंटिलेटर व बेड मिळत नाहीत, अशा परिस्थितीत शासनाकडून उपाययोजना करताना निधीची कमतरता भासत असल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर आता जिल्हा नियोजन समितीतून 50 टक्के निधी कोविडवरील उपाययोजनांसाठी वापरण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या 325 कोटींच्या वार्षिक आराखड्यातून सध्या 107.25 कोटी उपलब्ध झाले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 33 टक्के म्हणजेच 52 कोटी रुपयांचा निधी कोरोनासाठी वापरला जाणार आहे.
 
कोरोना महामारीचा राज्यात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे शासनाने कोविड उपाययोजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन नियोजन समितींना दिलेल्या निधीतून कोविड उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी याबाबत अंमलबजावणी करावयाची आहे. नियोजन समितीच्या 50 टक्के निधीतून सार्वजनिक आरोग्य विभाग, तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या जिल्हास्तरीय आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी वापरावयाचा आहे.

सावधान... तुमच्या फेसबुकवरून अश्लील चित्रे पोस्ट होण्याचा धोका! कशी घ्याल काळजी?

हा निधी सर्व शासकीय रुग्णालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची आरोग्य सुविधा पुरविणारी यंत्रणा, सर्व रुग्णालये, पालिकांची रुग्णालये यांना वितरित केला जाणार आहे. यातून कोविड रुग्णांसाठी हॉस्पिटलस उभारणे, सध्या उपलब्ध हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन सुविधा, तसेच बेड उपलब्ध करणे, औषधे, इंजेक्‍शनस्‌ खरेदीसाठी वापरला जाणार आहे. त्यासाठीचे नियोजन पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी करावयाचे आहे.

कोविड नियंत्रणासाठी ताबडतोब ९१ कोटींचा निधी द्या : पालकमंत्री पाटील 
 
सातारा जिल्ह्याची 2020-21 साठी जिल्हा वार्षिक योजना 325 कोटी रुपयांची आहे. त्यापैकी आतापर्यंत 33 टक्के निधी म्हणजेच 107.25 निधी उपलब्ध झालेला होता. त्यातील 50 टक्के निधी म्हणजेच 52 कोटी निधी आता कोविड उपाययोजनांवर खर्च केला जाणार आहे.
 
सध्या सातारा जिल्ह्यात कोविडची रुग्णसंख्या 22 हजारांवर गेली आहे. यापैकी प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 8483 आहे. इतक्‍या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याने सध्या अत्यावस्थ रुग्णांना व्हेंटिलेटर व ऑक्‍सिजन बेडही वेळेत उपलब्ध होत नाहीत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णाला व्हेंटिलेटर मिळत नसल्यामुळे बेडसाठीची रुग्णांची ससेहोलपट होऊ लागली आहे. सर्व काही निधीअभावी थांबल्याचे चित्र आहे. व्हेंटिलटर उपलब्ध करण्यास मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे, तसेच मनुष्यबळाची ही तितकीच आवश्‍यकता आहे. आता नियोजन समितीतून मिळणाऱ्या 52 कोटींच्या निधीतून सध्या तयारी सुरू असलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध करता येणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील हवा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT