satara  sakal
सातारा

सातारा : महिलांना ई-बाईक खरेदीस पाच हजार

बनवडी ग्रामपंचायतीची घोषणा; नववर्षानिमित्त सायकल रॅलीचेही आयोजन

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : आदर्श बनवडी ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन वर्षाचे औचित्य साधून ‘माझी वसुंधरा अभियानां’तर्गत पर्यावरणपूरक सायकल रॅली काढण्यात आली. गावामध्ये ई बाईकचे प्रदर्शन भरवण्यात आले. ज्या महिला ई बाईक खरेदी करतील त्यांच्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत पाच हजार अनुदान देण्याची घोषणा सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास करांडे यांनी केली. (Five thousand e-bikes for women in satara)

बनवडी गावामध्ये ‘माझी वसुंधरा’ या अभियानाची जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सायकल रॅली काढण्यात आली. सरपंच श्री. पाटील, उपसरपंच श्री. करांडे, ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकले, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कोठावळे, ग्रामपंचायत सदस्या पल्लवी साळुंखे, विद्या शिवदास यांच्यासह सदस्य उपस्थित होते. सरपंच पाटील यांनी प्रदूषणमुक्त स्वच्छ व सुंदर बनवडीचा संदेश नागरिकांना दिला.

रॅलीसाठी अरविंद थोरात, नवनाथ कारंडे, शरद कारंडे, संदीप साळुंखे घार्गे साहेब, शेवाळे साहेब, उदय थोरात आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमात बनवडी गावातील नागरिक व ग्रामपंचायत कर्मचारी पदाधिकारी सहभागी झाले. रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी ई बाईकचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व्ही. जी. थोरात एजन्सीचे उदय थोरात यांच्या वतीने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी सरपंच पाटील व उपसरपंच करांडे यांनी गावातील ज्या महिला ई बाईक खरेदी करतील त्यांच्यासाठी पाच हजार अनुदान देण्याचे घोषित केले. त्याचबरोबर व्ही. जी. थोरात एजन्सीचे उदय थोरात यांनीही तीन ते पाच हजार अनुदान देण्यात येईल, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT