सातारा

कास पठारला जायचं प्लॅनिंग करताय, मग घाई नको.. हे आधी वाचाच

Balkrishna Madhale

सातारा : 'युनेस्को'ने कास पठाराला 'वर्ल्ड हेरिटेज साइट'चा दर्जा दिल्यानंतर कासची फुले बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पठारावर फुलांचे ताटवे फुलायला सुरुवात होते. त्यामुळे हौशी छायाचित्रकार, पर्यटक पठार बघायला येतात. मात्र, यंदा कोरोनामुळे कास फुलोत्सवावर पाणी फिरले आहे. वन विभागानेही याबाबत अधिकृत कोणतीही घोषणा केली नसल्याने पर्यटकांत अजूनही संभ्रम आहे.

कास पठारावरील पावसाचा जोर अद्याप अपेक्षेइतका कमी झाला नसल्याने काही फुले फुलायला आताच सुरुवात झाली आहे. पुढील आठवड्यात पाऊस कमी झाल्यावर फुले बहरतील, अशी अपेक्षा आहे. हंगामाबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने पर्यटकांची पुरती निराशा झाली आहे. त्यामुळे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा असलेल्या कास पठाराचा यंदाचा फुलोत्सव साशंकतेच्या भोव-यात अडकण्याची चिन्हे आहेत. पठारावर फुलांचा हंगाम सुरु झाला तरी पर्यटकांना प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय पातळीवर अडकणार आहे. 

कास पठारावर दरवर्षी सप्टेंबर महिन्यात फुलणारा फुलांचा हंगाम राज्यातच नव्हे, तर देशपातळीवर प्रसिध्द आहे. ऑगस्टअखेर ते ऑक्टोबर या काळात नानाविध फुलांचे ताटवे येथे बहरतात. संयुक्त राष्ट्राच्या तज्ज्ञ समितीने निसर्गाचा हा दुर्मिळ वारसा जपण्यासाठी कास पठाराला जागतिक स्थळाचा दर्जा दिला. मात्र, यंदा कोरोना संक्रमणामुळे कासचा फुलोत्सव अडचणीत आला आहे. त्यामुळे पर्यटन हंगामाचे वेळापत्रक बिघडणार आहे. कासच्या पठाराला दरवर्षी दीड ते दोन लाख पर्यटक भेटतात. त्या माध्यमातून स्थानिक रोजगाराला चालना मिळते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे यंदा पर्यटनापासून स्थानिकांना मिळणाऱ्या उत्पन्नाला ब्रेक लागला आहे. 

राज्य शासनाने काही अंशी हॉटेल व कृषी पर्यटन केंद्रांना ३३ टक्के पर्यटकांना प्रवेश देण्याची परवानगी दिली असली तरी सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझेशन याचीही अट घातली आहे. मात्र, कास पठारावर पर्यटकांना प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंह घेणार आहेत. पर्यटकांना परवानगी दिल्यास डिस्टन्सिंग आणि स्वच्छता त्याचबरोबर सुरक्षितता याचे कोणतेही नियोजन वन विभागाकडे नसल्याने पर्यटन हंगामाचे तूर्त नियोजन करू नका, अशा सूचना वन विभागाने संयुक्त व्यवस्थापन समितीला दिल्या आहेत. तसेच कास पठारावरील यंदा हंगाम सुरु करण्यास काही स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असल्याचे समजते. त्यामुळे ग्रामस्थांचा विरोध डावलून प्रशासन कोणता निर्णय घेईल असं अजिबात वाटत नाही.

दीड महिन्यांचा कास पठाराचा फुलोत्सव येथील स्थानिकांच्या रोजगाराचा प्रमुख स्रोत आहे. बामणोली, तापोळा येथे नौकानयनामुळही लाखो रुपयांची उलाढाल होते. कोरोनामुळे बोटचालकांचा उन्हाळ्याचा हंगाम वाया गेला. आता कास फुलोत्सवाच्या निमित्ताने पर्यटकांना माफक संख्येने परवानगी दिली जावी, अशी कास ग्रामस्थांची अपेक्षा आहे. कास पठाराला महिनाभरात भेट देणाऱ्यांची संख्या तीन वर्षांपूर्वी नियंत्रणाबाहेर गेल्याने जैवविविधता धोक्यात आली होती. सुट्टीच्या दिवशी पठारावर ५० ते ६० हजार पर्यटक हजेरी लावत होते. त्यामुळे वन विभागाने पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा आणली. परंतु, यावर्षी पुष्प पठार सुरु होणार नसल्याने वन समितीला मोठा फटका बसला आहे.

दरवर्षी वन समिताकडून पर्यटकांसाठी नियमावली तयार केली जाते. यात सुट्टीच्या दिवशी ऑनलाइन बुकिंग बंधनकारक, सुट्टीच्या दिवशी प्रति पर्यटक १०० रुपये पर्यावरण शुल्क, फोटोग्राफीसाठी १०० रुपये उपद्रव शुल्क, १० पर्यटकांसाठी एका तासासाठी १०० रुपयांत प्रशिक्षित गाइड, वाहनाच्या प्रकारानुसार १० ते १०० रुपयांपर्यंत वाहनतळ शुल्क, तसेच १२ वर्षे वयापर्यंतचे विद्यार्थी आणि ६५ वर्षांपुढील ज्येष्ठांना शुल्क माफ (परिस्थितीनुसार यात बदल होऊ शकतो.), असे आकारण्यात येत असते. मात्र, यंदा हंगाम सुरु होणार की, नाही यावरती अद्याप विचार मंथन सुरु आहे. त्यामुळे यंदाचा फुलोत्सव होणार की, नाही याची साशंकता आहे. 

जिल्हाधिका-यांचे अद्याप कोणतेच आदेश नाहीत!
सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिस्थितीही हाताबाहेर चालली असून प्रशासन वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्या परीने प्रयत्न करत आहे. कास पठारावर दरवर्षी सप्टेंबर महिन्यात फुलणारा फुलांचा हंगाम राज्यातच नव्हे, तर देशपातळीवर प्रसिध्द आहे. मात्र, यंदा हा फुलोत्सव होणार की, नाही याबाबत अद्याप कोणताच निर्णय झाला नाही. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही पठार सुरु करण्याबाबत कोणतीही परवानगी दिली नाही. त्यामुळे यंदाचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे. राज्यावर कोरोनाचे संकट ओढावल्याने पठार सुरु करायचे की नाही हा सर्वस्वी अधिकार जिल्हा प्रशानाचा आहे, त्यामुळे तूर्तास तरी यावरती कोणताही तोडगा नाही. 

-एस. एस. परदेशी, वनपरिक्षेत्र अधिकारी, कास पठार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

सुबोध-तेजश्रीचे जुळले सूर ; बहुप्रतीक्षित हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dev Diwali 2024: देव दिवाळी का साजरी केली जाते? वाचा इतिहास अन् धार्मिक महत्व

Supriya Sule In Nashik : कांद्याला हमीभाव मिळवून देणार; खासदार सुप्रिया सुळे यांची चांदवडच्या सभेत ग्वाही

SCROLL FOR NEXT