सातारा

ग्रामपंचायत निवडणुक लढविणार आहात! वेगवेगळ्या प्रभागातून अर्ज भरु नका

उमेश बांबरे

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उद्या (बुधवार) पासून सुरवात होत आहे. 30 डिसेंबरच्या दुपारी तीनपर्यंत मुदत आहे. या कालावधीत सार्वजनिक सुट्या असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे पाच दिवसांचा अवधी मिळणार आहे. एक व्यक्ती एका प्रभागातून एकच अर्ज करू शकणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यांना किती खर्च करता येईल, हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार सात व नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत 25 हजारांची मर्यादा ठरवून दिली आहे. 11 ते 13 उमेदवार असलेल्या ग्रामपंचायतीतील प्रत्येक सदस्याला निवडणूक कालावधीत 35 हजारांचा खर्च करता येईल. 15 ते 17 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीतील सदस्यांना 50 हजारांपर्यंत खर्च करता येणार आहे, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील (एससी) उमेदवारास प्रत्येकी शंभर रुपयांचे डिपॉझिट द्यावे लागणार आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठीही शंभर रुपये अनामत असून, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपयांची अनामत रक्‍कम भरावी लागणार आहे.
 
जात प्रमाणपत्रांची पडताळणी करून वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याची प्रक्रिया एक ऑगस्टपासून सुरू झाली आहे. जात पडताळणी अर्ज ऑनलाइन एक खिडकी योजनेतून घ्यावा. समितीला पडताळणीसाठी द्यावा लागणारा अर्ज तहसील कार्यालयातून घ्यावा. जात पडताळणी समिती कार्यालयास दिलेले पत्र, जात पडताळणीसाठी दिलेली कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावीत. उमेदवाराने ऑनलाइन जातपडताळणी प्रस्तावाची प्रत, ऑनलाइन पैसे भरल्याची पावती व मूळ कागदपत्रे छायांकित प्रतींसह पडताळणी कार्यालयास द्यावीत. जात पडताळणीच्या प्रस्तावाची पोचपावती, ऑनलाइन पैसे भरल्याची पावती व वैधता प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर 12 महिन्यांत द्यावे लागणार आहे.

कर्करोगग्रस्तांची सेवा करणा-या तिवाटणेंना आरोग्यरक्षक पुरस्कार; शिर्डीत वितरण
 
एक व्यक्‍ती एका प्रभागातून एकच अर्ज करू शकणार आहे. एका प्रभागातून अधिकाधिक चार उमेदवारी अर्ज भरता येतील. एका प्रभागात भरलेल्या अर्जांतून एक अर्ज वैध धरला जाईल. एक अर्ज उमेदवाराने मागे घेतला तर त्या प्रभागातून संबंधिताने माघार घेतली, असे समजले जाईल. उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरल्यानंतर उमेदवाराने हमीपत्र व घोषणापत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यायचे आहे. निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करीत असल्याचे हमीपत्र, अपत्यांबाबतचे घोषणापत्र, शौचालयाचा वापर करीत असल्याचे प्रमाणपत्र, अनामत रकमेची पावतीही बंधनकारक आहे. ग्रामपंचायतीचा थकबाकीदार व ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, नावात बदल नसल्याचे प्रमाणपत्र, ओळखपत्र व बॅंक पासबुक (राष्ट्रीयकृत तथा शेड्यूल बॅंक) द्यावे लागणार आहे. 

उमेदवारांसाठी 190 चिन्हे 

एका प्रभागात एक चिन्ह वाटप झाल्यानंतर तेच चिन्ह त्याच प्रभागातील दुसऱ्या उमेदवाराला मिळणार नाही. निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांसाठी 190 मुक्‍त चिन्हांपैकी एक चिन्ह उमेदवार निवडू शकतो. 

पुण्याला निघालेल्या जोशी कुटुंबीयांवर काळाचा घाला; बोरगावनजीक मोटार अपघातात एकाचा मृत्यू 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT