कऱ्हाड (सातारा) : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटीलही (Harshvardhan Patil) आता सरसावले आहेत. त्यांनी कालच खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांची भेट घेतली, तर आज कऱ्हाडमध्ये येवून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan) यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी मराठा आरक्षणावर चर्चा केली. (Former Minister Harshvardhan Patil Met MLA Prithviraj Chavan On Maratha Reservation Issue)
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटीलही आता सरसावले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षणाची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्याने मराठा आरक्षणासाठीची कार्यवाही सुरु झाली आहे. खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यातील विविध भागांचा दौरा करुन सहा जूनपर्यंत तीन मागण्यांसाठी सरकारला अल्टिमेटम दिला असून मागण्या मान्य न झाल्यास रायगडावरुन आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय.
त्यातच आता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही मराठा आरक्षणासाठी राज्यातील नेत्यांना भेटण्यासाठीची कार्यवाही सुरु केली आहे. त्याअंतर्गत त्यांनी काल खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह जिल्ह्यातील अन्य नेत्यांचीही भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आज माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी आरक्षासंदर्भात चर्चा केली आहे.
राजकीय भेट नाही
माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांच्या भेटीला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आज कऱ्हाडमध्ये आले होते. त्यामुळे राजकीय पटलावर त्याच्या वेगवेगळ्या चर्चा रंगवण्यात येत आहेत. मात्र, ही भेट राजकीय नसून मराठा आरक्षणासाठीच असल्याचे दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आले.
Former Minister Harshvardhan Patil Met MLA Prithviraj Chavan On Maratha Reservation Issue
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.