सातारा

बेस्टच्या सेवेतून काेराेनाची बाधा; महाबळेश्वरातील एसटी कर्मचारी धास्तावले

सिद्धार्थ लाटकर

सातारा : मुंबई येथे लोकल सेवा बंद असल्याने सातारा विभागातील एसटीच्या चालक- वाहक तसेच इतर कर्मचाऱ्यांना देखील अत्यावश्यक सेवा म्हणून पाठवण्यात येत आहे. सातारा विभागातील मुंबई येथे बेस्टची सेवा बजावून आलेले महाबळेश्वर आगारातील १५ हुन अधिक कर्मचारी हे कोरोनाबाधित झाले आहेत. याबराेबरच आगारातील कामगारांचा बधितांचा आकडा वाढू लागल्याने कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. परिणामी बाधित कर्मचा-यांची संख्या वाढू लागल्याने बेस्टच्या सेवेतून महाबळेश्वर आगारास सूट देण्यात यावी अशी मागणी महाबळेश्वर आगार मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना यांनी सातारा विभागीय नियंत्रकांकडे नुकतीच केली आहे.

सध्या सातारा विभागातून मुंबई येथे बेस्ट उपक्रमाच्या सेवेसाठी बस, चालक,वाहक देण्यात येत आहे. महाबळेश्वर आगारातून तीन ऑक्टोबर पासून प्रत्येक आठवड्याला २० चालक आणि २० वाहक पुरवण्यात येत आहेत. बेस्टची सेवा बजावून आलेले कर्मचारी कोरोनाबाधित होत आहेत. मुंबई येथे राहण्याची ,जेवण्याची सेवा निकृष्ट असल्याने हे कामगार आजारी पडत आहेत. आतापर्यंत महाबळेश्वर आगारातील १४ हुन अधिक कर्मचा-यांना कोरोनाची बाधा झाली. त्यातच मुंबई येथे सेवा बजावत असताना एका खोलीत चार ते पाच कर्मचारी एकत्र राहत असतात. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण  वाढण्याची भीती आहे असे विभाग नियंत्रकांना देण्यात आलेल्या निवेदनात 
संघटनेने नमूद केले आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी चांगली बातमी, आजपासून लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ 

ज्या कामगारांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशा कामगारांचे विलगिकरण करणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नाही. हे बाधित कर्मचारी घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांच्या देखील संपर्कात येतात. त्यामुळे कोरोनाची साखळी वाढण्याची भीती निर्माण होत आहे. जे कर्मचारी बधितांच्या संपर्कात आले आहेत त्यांनाही कोरोनाची सौम्य लक्षणे दाखवत आहेत. सर्दी, खोकला, अंगदुखि, ताप ,अशक्तपणा ही लक्षणे दिसून येत असताना देखील या कर्मचाऱ्यांना आगारात सेवेसाठी बोलावले जात आहे. त्यामुळे महाबळेश्वर आगारात कोरोनाचा फैलाव होण्याची भीती निर्माण होत आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कास, ठोसेघरला दिवाळीनंतर भेट देणार : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

बधितांचा आकडा वाढू लागल्यास महाबळेश्वर आगार कोरोनाचा हॉटस्पॉट होईल अशी शक्यता वाटते. महाबळेश्वर हे थंड हवेचे जगप्रसिद्ध ठिकाण असून येथे हॉटेल व्यवसाय नुकताच सुरू झाला आहे. दिवाळी हंगाम थाेड्याच दिवसांत सुरु हाेील. ग्रामीण विभागात एकमेव दळण वळणाचे साधन एसटी असून एसटीचे कामगार जर कोरोनाबाधित झाले तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला सेवा कोण देणार असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.

ज्याप्रमाणे कोल्हापूर, सांगली विभागात बेस्टसाठी गेलेले कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते. त्यावेळी या दोन्ही विभागांनी  आपापले कर्मचारी परत बोलावले होते. त्यानुसार महाबळेश्वर आगारात कोरोनाबधितांची संख्या वाढू नये म्हणून एसटी प्रशासनाने महाबळेश्वर आगाराला बेस्टच्या सेवेतून वगळावे, अशी मागणी एसटी कामगार संघटनेची असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सैनिकांनाे! दीपावलीनिमित्त मिलिटरी कॅंटीन सुरु राहणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ही धारणा चुकीची; लगेच नवीन सरकार अस्तित्वात येणे बंधनकारक नाही, यापूर्वी 'इतक्या' वेळा विधानसभेची मुदत संपल्यानंतर शपथविधी

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! ऋषभ पंतवर तब्बल २७ कोटींची बोली

Maharashtra Election Result 2024: विरोधकांचे उरले-सुरले आमदारही सत्तापक्षाच्या संपर्कात; आणखी दोन पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

Rishabh Pant IPL Mega Auction 2025 : ऋषभ पंतला बम्पर लॉटरी! SRH, LSG यांनी जबरदस्त जोर लावला; श्रेयसचा 26.75cr चा विक्रम मोडला

Shreyas Iyer IPL Mega Auction 2025 : श्रेयस अय्यर आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, PBKS ने मोजली तगडी रक्कम

SCROLL FOR NEXT