सातारा : येथील हदयराेग तज्ञ डॉ. धैर्यशील भाऊसाहेब कणसे यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये पश्चिम भारतात प्रथमच फ्रोजन एलिफंट ट्रंकची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. वैद्यकीय पथकाने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर 15 तासांच्या कालावधीनंतर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने संबंधित महिलेच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला हाेता.
या शस्त्रक्रियेविषयी डॉ. कणसे यांनी माहिती दिली. महिलेच्या शरीरातील गुंतागुंत लक्षात घेऊन उपचारावेळी तीन प्रमुख कार्यपद्धती कार्यान्वित करण्यात आल्या. त्यावेळी त्या महिलेचे वय 33 वर्षे होते आणि ती 30 आठवड्यांची गर्भवती होती. तपासणीदरम्यान त्या महिलेच्या शरीरात दुर्मिळ गुंतागुंत निर्माण झाल्याचे समोर आले. या गुंतागुंतीमुळे त्या महिलेच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकला असता. त्यासाठी फ्रोजन एलिफंट ट्रंकसह टोटल एऑर्टिक आर्च रिप्लेसमेंट नावाच्या ऑपरेशनची आवश्यकता होती. त्या महिलेच्या शरीरातील गुंतागुंत लक्षात घेत तीन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार डॉ. अस्मिता पोतदार यांनी संबंधित महिलेचे सिझेरियन केले. यावेळी कार्डियाक सर्जन आणि व्हॅस्क्युलर सर्जन सहभागी झाले होते. सिझेरियननंतर दहा दिवसांनी मुख्य शस्त्रक्रिया होणार होती. हृदयातील दोषावरची शस्त्रक्रिया डॉ. कणसे यांनी केली. त्यापूर्वी महिलेची बेंटाल शस्त्रक्रिया करण्यात आली.
पर्यटकांनाे! महाबळेश्वर, पाचगणीला फिरायला निघालात? मग हे वाचाच
त्यानंतर महाधमनीसह उरलेल्या रोगग्रस्त भागासाठीची वैद्यकीय प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये डॉ. अद्वैत कोथुरकर, डॉ. शार्दुल दाते, डॉ. नीलेश जुवेकर, डॉ. शर्मिला देशपांडे सहभागी झाले होते. या शस्त्रक्रियेसाठी 15 तासांचा कालावधी लागला. त्यानंतर प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी डॉ. प्रशांत मिश्रा यांनी प्रयत्न केले. या शस्त्रक्रियेदरम्यान संबंधित महिला रुग्ण ही कोरोनाबाधित आढळली. त्यानंतर संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. भरत पुरंदरे यांनी तिच्यावर उपचार केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.