मलकापूर (सातारा) : येथील नगरपालिकेने पाचवडेश्वर येथील कोविड स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यविधीची विनामूल्य सोय केली आहे. पालिकेच्याच कोरोनायोद्ध्यांनी (Corona Warriors) अहोरात्र सेवा देत पहिल्या टप्प्यात 95, तर दुसऱ्या टप्प्यात 24 मे अखेर तब्बल 137 अशा 232 मृतदेहांचा अंत्यविधी केला आहे. (Funeral Of 232 Patients At Covid Cemetery At Pachwadeshwar Satara Marathi News)
कोविड बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कऱ्हाड पालिका एकमेव पर्याय होता.
कोविड बाधित (Corona Patient) मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कऱ्हाड पालिका (Karad Municipality) एकमेव पर्याय होता. अंत्यविधीचा वाढता ताण विचारात घेता शासनाने मलकापूर पालिकेला सूचना केली. पाचवडेश्वर येथील स्मशानभूमीत ता. 11 सप्टेंबरपसून बाधितांचे अंत्यविधी केले जात आहेत. पालिका कंत्राटी पध्दतीसह विविध पर्याय शोधत असतानाच पाचवडेश्वर कोविड स्मशानभूमीचे मलकापूरने दायित्व स्वीकारले. पश्चिम महाराष्ट्रातील मोठे असलेले कृष्णा रुग्णालय मलकापूरमध्ये (Krishna Hospital Malkapur) असल्याने तुलनेने जास्तीत जास्त कोरोना बाधितांवर उपचारही याच रुग्णालयात होतात. दिवसेंदिवस गावोगावी बाधितांची संख्या वाढल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे.
कृष्णा रुग्णालयात मृत झालेल्या कोणत्याही गावच्या बाधितावर पाचवडेश्वर स्मशानभूमीत अंत्यविधी केला जातो. मलकापूर शहर, कृष्णा रुग्णालय, काले, येवती, सवादे प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या 41 गावांसह क्रांती सर्जिकल आयसीयू सेंटरमधील कोविड बाधित मृतदेहांवर अंत्यविधीची विनामूल्य सोय केली आहे. त्याचबरोबर क्रांती सर्जिकल आयसीयू सेंटर, वारणा कोविड सेंटरसह (Covid Center) काले 16 व येवती प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 25 अशा 41 गावांचा समावेश आहे. पालिकेच्या कोविडयोद्ध्यांनी आठ महिन्यांत तब्बल 232 कोरोनाबाधित मृतदेहांवर विधिवत अंत्यविधी केले.
जिगरबाज कर्मचाऱ्यांचे योगदान
पालिकेतील आरोग्य विभागातील अमर तडाखे, यशवंत काटवटे, राहुल विरकायदे, रोहित काटवटे, आशिष कुरले, अरुण कुरले व कृष्णा दणाने हे कर्मचारी कोविड स्मशानभूमीत अहोरात्र सेवा देत आहेत. पालिकेसह शासनाने जबाबदारी दिलेल्या गावात कोरोनाने मृत्यू झालेल्या 237 मृतदेहांवर या सर्वांनी अंत्यसंस्कार केले आहेत.
Funeral Of 232 Patients At Covid Cemetery At Pachwadeshwar Satara Marathi News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.