सातारा

कर्मचारी जीवावर उदार, करताहेत कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार!

Balkrishna Madhale

सातारा : कोरोनाने सगळी समीकरणे, सगळी गृहितकं बदलून टाकली आहेत. जगण्याची पद्धत बदलली. कोरोनाने लोकांमध्ये अशी दरी निर्माण केली, की हक्काच्या माणसांना सुद्धा अंत्यसंस्काराला उपस्थित राहता येत नाही. ना अश्रूंचा हंबरडा, ना आप्तस्वकियांकडून खांदा दिला गेला. इतकंच काय तर परिवारातील लोकांकडून रचल्या गेलेल्या सरणावर चिताग्नी सुद्धा देता येत नाही. कोरोना महामारीत बाधितांचा आकडा जिल्ह्यात पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दररोज सरासरी चार ते पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विशिष्ट नियमावली आहे. नातेवाईकांना जरी परवानगी असली तरी पीपीई किट घालून लांबूनच दर्शन घ्यावे, असे नियमात आहे. यासाठी सातारा पालिकेने तयार केलेले पथक सदैव तयार असते. अगदी रात्री-अपरात्री जरी फोन आला तरी हे पथक लगेच जिल्हा रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेऊन कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करताहेत.
पंचगंगेची पाणी पातळी 37 फुटांवर 
 
दरम्यान, साताऱ्यात एकीकडे कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे, कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या लोकांवर उपचार सुरु असताना दगावणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. कोरोनाने मृत झालेल्या परिवारातील लोक कुठे संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, तर कुणी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशा लोकांची अंत्यसंस्काराची जबाबदारी पालिकेनी घेतली आहे. कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेकडून पीपीई किट दिले जाते आहे. मात्र, नैसर्गिक मृत्यू, कोरोनाने मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या पाहता अंत्यसंस्कार करताना त्यांनाही मर्यादा येत आहेत. अशावेळी हे कर्मचारी निस्वार्थपणे आपली भूमिका चोख बजावत आहेत. सातारा शहरात क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय असून तिथे कोरोना बाधितांवर उपचार केले जातात. शहरात खासगी रुग्णालयांमध्ये देखील  बाधित रुग्णांचवर उपचार केले जातात. उपचारासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्ण येत आहेत. काहींचा उपचारादरम्यान मृत्यू होतो, तेव्हा त्यांच्या गावी कोविड  नियमाने अंत्यसंस्कार करण्याची सुविधा नाही अथवा मुभा देखील नाही. ही मुभा सातारा पालिकेकडे असल्याने पालिकेचे पथक तयार असते. जिल्हा रुग्णालयातून पालिकेकडे पत्र येते. पत्र येताच, केवळ अर्ध्या तासात ही टीम पीपीई किट घालून रुग्ण वाहिका, सॅनिटायझर गाडी घेऊन तिथे पोहचते. रुग्णाचा मृतदेह व्यवस्थितरित्या पॅकिंग केलेला आहे का, हे पाहूनच ते पथक पुढची कार्यवाही करते. एका लाकडी पेटीत तो मृतदेह ठेवून ती पेटी रुग्ण वाहिकेतून कैलास स्मशानभूमीत नेली जाते. स्मशानभूमीत कोरोना बाधित मृत्यू पावलेल्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेगळे अग्निकुंड राखीव आहेत. तेथे पालिकेचे कर्मचारी नियमानुसार अंत्यसंस्कार करताहेत. अंत्यसंस्कार करतेवेळी जी नियमावली आहे, त्यानुसार कार्यवाही केली जाते.

सातारकरांनाे... कुटुंबाचे, समाजाचे रक्षण करण्यासाठी हे करा : जिल्हाधिकारी शेखर सिंह
 
दरम्यान, अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यानंतर अंगावरचे पीपीई किट, हातातील हॅंड ग्लोज काढून ते सोबत आणलेल्या गाडीतल्या एका पिंपात टाकून नष्ट केले जाते. स्मशानभूमी दहन केल्यानंतर सॅनिटायझ केले जाते. निर्जंतुक फवारणी करून पुन्हा दुसऱ्या कार्यवाहीसाठी हे पथक तयार असते. सातारा तालुक्‍यातील बाधितांचा आकडा हजारच्या जवळपास पोहचला आहे. कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची संख्या सुमारे चार ते पाच एवढी दररोज होत आहे, त्यामुळे स्वतःच्या जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या या टीमचे कौतुक होत आहे. आज पहायला गेले तर कोणीही कोविड रुग्णाच्या जवळ येत नाही, नातेवाईक ही जवळ येण्यास धजावत नाहीत. डॉक्‍टरांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, काहींचा यात मृत्यू होताना दिसत आहे. त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पालिका कर्मचाऱ्यांवर आहे आणि ते ही आपली चोख भूमिका बजावत आहेत, जीवाची पर्वा न करता. त्यांच्या याच कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.

कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी 'या' शहरात करावे लागते 15 तासांचे वेटिंग!  

पालिका कर्मचाऱ्यांची चोख भूमिका
 
कोरोना रुग्णालयात बाधितांच्या संख्येबरोबरच मृतांचा आकडाही वाढत आहे. बाधितांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकही मृतदेहाला हात लावत नसल्याने मृतदेहांची अवहेलना होत आहे. मात्र, काळजावर दगड ठेवून पालिकेचे कर्मचारी कोव्हिड रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यास तत्पर आहेत. कोरोना हा भयानक आजार आहे, असे सध्या बिंबवले गेले असल्याने प्रत्येकाच्या मनात कोरोनाबाबत भीती आहे. अंत्यसंस्कार करण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्यात नातेवाईक महत्वाची भूमिका पार पाडत असतात. परंतु कोरोनामुळे सर्व विधी नातेवाईकांनी करण्याऐवजी ते पालिकेचे पथक करते. अगदी सरण रचून पूर्णपणे दहन होईपर्यंत हे पथक कार्यवाही करते. हे काम करत असाताना थोडीही निष्काळजीपणा चालत नाही. कर्मचारी कोरोनाने मृताचे शव संबंधित हॉस्पिटलमधून ताब्यात घेतात आणि त्यावर अंत्यसंस्कार करतात. कधी विद्युत दाहिनीवर, तर कधी सरणावर. विशेष म्हणजे हे करत असताना सुरक्षेबाबत सगळी खबरदारी घेतली जात आहे, त्यामुळे स्वतःच्या काळजावर दगड ठेवून दिलेली जबाबदारी चोख पार पाडताना पालिकेचे कर्मचारी दिसताहेत.

करुन दाखवलं : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कऱ्हाड पालिका देशात अव्वल, सलग दुसऱ्या वर्षी यश 

कैलास स्मशान भूमी व्यवस्थापनाचे आवाहन

संगम माहुली येथील कैलास स्मशान भूमी मध्ये सध्या कोविड आणि नॉनकोविडचे अंत्यसंस्कार होत आहेत. पावसाळ्यात होणारे वेगवेगळे आजार वृद्धपकाळ, अपघात या मुळे दरवर्षीच जून, जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबरमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत असते. तसेच सातारा जिल्ह्यातील किंवा परजिल्ह्यातील कोविड रुग्ण उपचार घेत असून दुर्दैवाने काहीजणांचा सातारा येथे रुग्णालात मृत्यू  हाेत आहे. त्याही सर्व रुग्णांवर कैलास स्मशानभूमीतच अंत्यसंस्कारसाठी आणले जात आहे.

प्रियजनांचे अंत्यदर्शन जगाच्या कानाकोपर्‍यातुन होण्यासाठी 'या' ट्रस्टचा पुढाकार 

या दोन्ही कोविड आणि नॉनकोविड मृतदेह यांचे अंत्यसंस्कार संगम माहुली कैलास स्मशान भूमीत होत आहेत. ओघाने स्मशान भूमीत अंत्यसंस्कारचे प्रमाण काही पटीने वाढले आहे, त्यात सततच्या पावसामुळे अंत्यसंस्कार करताना अडचणी येतात. तसेच जास्त पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होऊन स्मशान भूमीत खालच्या कट्ट्यावर असलेले नऊ अग्निकुंड पाण्याखाली जाऊ लागले आहेत. या अडचणींचा विचार करता जो पर्यंत अंत्यसंस्कारचे प्रमाण जास्त आहे तोपर्यंत मृतदेहास अग्नी दिल्या नंतर सहा ते सात तासाने रक्षा काढून घ्याव्यात व त्यातील अस्थी अन्य विधिंसाठी एक मातीच्या मडक्यात बाजूला काढून ठेवावेत. दुसऱ्या दिवशी सावडणे विधी करावेत. हा एकमेव पर्याय समोर आला आहे. या पद्धतीने नियाेजन झाल्यास मृतदेह घरी, हॉस्पिटलमध्ये ठेवावा लागणार नाही. संबंधित कुटुंबियांतील व्यक्तींना सुध्दा दुःखाच्या काळात आणखी मानसिक त्रास होणार नाही. जी स्थिती निर्माण झाली आहे, त्याप्रमाणे नियोजन करण्यात येत आहे. यामुळे सर्वच मृतदेहावर अंत्यसंस्कार व्यवस्थित होऊ शकतील असे व्यवस्थापनाच्यावतीने श्री बालाजी चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र चाेरगे यांनी नमूद केले.

नक्की वाचा... अकरावी प्रवेश वेळापत्रकामध्ये बदल,  आता या तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
 

  •  मृतदेह कैलास स्मशान भूमित आणण्या अगोदर नोंद करणे महत्त्वाचे आहे.

  • येताना आधार कार्ड किंवा कोणतेही शासकीय कार्ड किंवा बँक पासबुकची प्रत आवश्यक आहे. (बाहेरील पत्ता असेल तर अंत्यसंस्कार करता येणार नाहीत.)

  •  सद्य परिस्थितीत अंत्यसंस्कार झालेनंतर सहा ते सात तासाने संबंधित अग्निकुंडामधील रक्षा काढून अस्थी कुंडात विसर्जन कराव्यात. तसेच विधीसाठी लागणाऱ्या थोड्या अस्थी मडक्यात ठेऊन त्यावर फडके बांधून, नाव टाकून स्मशान भूमितच ठेवुन दुसऱ्या दिवशी सावडणे विधी करावा. (मडके मिळण्याची सोय संगम माहुली येथील चहा टपरीवर केली आहे.)
     
  • अस्थी ठेवणेसाठी कैलास स्मशानभूमीत फक्त एक दिवसच सोय केली आहे. नंतरची जबाबदारी राहणार नाही.

     
  • Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT