Satara News : येथील पालिकेने स्वच्छतेमध्ये देशात सलग तीनवेळा प्रथम क्रमांक पटकावला. दररोज रात्री आणि पहाटेच्या सुमारास प्रशासनाकडून स्वच्छता केली जाते. जमा करण्यात आलेला कचरा साठवण्यासाठी पालिकेने १२ डबरी परिसरात डेपो केला आहे.
मात्र, तरीही येथील कोविड स्मशानभूमीच्या जवळील परिसरात राजरोसपणे कचरा टाकला जात आहे. त्यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्याकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच झाले आहे. पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढून कचरा पाण्यातून वाहून जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
कोविड स्मशानभूमीजवळ जो कचरा साचत आहे. त्यामध्ये बहुधा मेडिकल आणि सर्जिकल साहित्याचा समावेश असतो. घरात अनेक दिवस पडलेली, मुदतबाह्य औषधे नागरिक कचऱ्यामध्ये टाकून देतात.
अनेकदा तोच कचरा त्या परिसरात टाकण्यात येतो. त्यामुळे त्या परिसरातील कचऱ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. पाण्यातून तो कचरा वाहिल्यास नदीकाठच्या लोकांना धोका होऊ शकतो.
शहरातील वैकुंठ स्मशानभूमीच्या खालच्या बाजूला नदीकडेला कोविड स्मशानभूमी प्रशासनाकडून करण्यात आली होती. तेथून जवळच कृष्णा नदीचे पात्र आहे. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढते.
त्यावेळी कोविड स्मशानभूमीजवळ पाणी येते. त्यामुळे तेथे साचलेला कचरा हा त्या पाण्याबरोबर वाहून जाण्याची शक्यता आहे. तो कचरा पाण्याबरोबर गेल्यावर कऱ्हाडच्या खालच्या अनेक गावांतील नदीकाठच्या लोकांना तेच पाणी प्यावे लागणार आहे. त्यामुळे त्या परिसरात नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
कऱ्हाड शहरात कर विभागाकडील २०१९ च्या माहितीनुसार १२ हजार ९०० घरगुती, तर पाच हजार १४१ कमर्शिअल मिळकती आहेत. शहरात रोज १३ ते १४ टन घनकचरा संकलन घंटागाड्यांच्या माध्यमातून होते. यात सुमारे आठ टन ओला कचरा, तर सुमारे सहा टन सुका कचरा रोज संकलित केला जातो. १०० टक्के कचरा संकलन, वर्गीकरण व प्रक्रिया यावर पालिकेने भर दिला आहे.
कऱ्हाड पालिकेचे शहरातील कचऱ्याकडे मोठे दुर्लक्ष झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर कचरा साचलेला असतो, तो वेळेत उचलला जात नाही. त्याचबरोबर सध्या कचरा हा कोविड स्मशानभूमीच्या परिसरात कृष्णा नदीकाठीच डंपिंग केला जात आहे. तो कचरा जर कृष्णा नदीच्या पाण्यात मिसळला, तर नदीकाठी असणाऱ्या गावांतील लोकांच्या आरोग्याला धोका होणार आहे. त्याकडे पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.
– प्रमोद पाटील. दक्ष नागरिक, कऱ्हाड
कऱ्हाड पालिकेमार्फत दररोज घंटागाडीमार्फत शहरातील कचऱ्याचे संकलन केले जाते. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा संकलित करून तो डंपिंग डेपोत टाकला जातो. तेथे कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. सध्या कोविड स्मशानभूमी परिसरात कचरा टाकला असेल, तर तेथे स्वच्छता केली जाईल.
– मिलिंद शिंदे, आरोग्य निरीक्षक, कऱ्हाड पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.