griffon vulture esakal
सातारा

अन्नाच्या शोधार्थ परदेशी गिधाडाची 'सह्याद्री'त गिरकी; 'व्याघ्र'त दुर्मिळ 'ग्रिफॉन'ची नोंद

सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेला परदेशातल्या पर्वत रांगातील दुर्मिळ ग्रिफॉन गिधाडाची (griffon vulture) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या (sahyadri tiger project) पर्वत रांगात पहिल्यांदाच नोंद झालीय. कोयनेच्या जंगली जयगड परिसरात गिधाडाचे वास्तव आहे. वनविभाग व पक्षी तज्ञांनी त्याच्या नोंदी टिपून त्याचे छायाचित्रही घेतले आहे. ग्रिफॉन गिधाड तिबेट, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तानसह हिमालय नेपाळ, भूतान, पश्चिम चीन, मंगोलिया दक्षिणेकडील युरोप, उत्तर आफ्रिका या भागात आढळतो. त्यामुळे ह्या गिधाडाने हजारो किलोमीटरचा प्रवास केला असावा, असाही अंदाज आहे. याची माहिती जगभरातील तज्ञांना कळवली आहे. त्यामुळे त्याच्या प्रवासाचा लवकरच उलगडा होईल. (griffon vulture found in sahyadri tiger project recorded first time)

हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या परदेशातल्या दुर्मिळ ग्रिफॉन गिधाडाची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पर्वत रांगात पहिल्यांदाच नोंद झालीय.

ग्रिफॉन गिधाड हजारो किलोमीटरचा प्रवास करून आला असावा, असा वन्यजीव विभागासह तज्ञांचा अंदाज आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंयगील जयगडच्या उंच घिरट्या घालतानाचे त्याचे छायाचित्र मिळाले आहे. उंच आकाशातही घिरट्या मारणारे ग्रिफॉन गिधाड अन्नाच्या शोधार्थ हजारो किलोमीटरचा प्रवास करते. त्याचे इंग्रजी नाव ग्रिफॉन वलचर तर गीप्स फुल्वस शास्त्रीय नाव आहे. ग्रिफॉन गिधाड आकाराने मोठा असून उंची साधारणपणे १२५ सेंटीमीटर आहे. दोन पंखांसह त्याची लांबी नऊ फुटापर्यंत आहे. नर व मादीचे वजन 10 किलो पर्यंत असते. ग्रिफॉन गिधाडांच्या दुर्मिळ प्रजातीपैकी आहे. त्याच्या डोक्यावरील पंख पांढरे शुभ्र तर पाठीवरचे पंख रुंद व तांबूस आहेत. शेपटीचे पंख गर्द चॉकलेटी आहेत. अन्य गिधाडांप्रमाणेच ग्रिफॉनही कुजलेले व सडलेले मांस खाणारा आहे.

उंच कठड्यांवर घरटे करून प्रजनन व अंडीही देतो. तोच ग्रिफॉन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली जयगड भागात घिरट्या घालत असताना वनक्षेत्रपाल स्नहेल मगर व वनरक्षक संतोष चाळके यांना दिसला. त्यांनी त्याला कॅमेराबध्द केले. त्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिली. त्यांनी अभ्यास करून तो पक्षी ग्रिफॉन गिधाड आहे, असे स्पष्ट केले. त्या पक्षाच्या उजव्या पंखावर नारंगी टॅग लावला आहे. त्यामुळे तो टॅग अभ्यासासाठी लावला, असावा असा अंदाज आहे. अत्यंत महत्वाची नोंद व निरीक्षण केल्याबद्दल स्नहेल मगर व संतोष चाळके यांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पचे क्षेत्रसंचालक समाधान चव्हाण, उपसंचालक उत्तम सावंत, सहायक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी कौतुक केले.

सह्याद्री पर्वत रांगात आढलेल्या ग्रिफॉन गिधाडाच्या पंखाला टॅग आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या शास्त्रीय स्थलांतराच्या अभ्यासाठी तो टॅग लावून त्याला अभ्यासकांनी सोडला आहे, त्याची माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या देशात गिधाडांवर अभ्यास करणाऱ्या संशोधकांना व आंतरराष्ट्रीय संस्थांना संपर्क केला आहे. येथील नोंदीची माहिती कळवली आहे. त्यामुळे त्याचा प्रवासही लवकरच उलगडेल, असा अंदाज आहे.

-रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक, कऱ्हाड

Good News : ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा होणार ऑनलाइन, शासनाकडून परवानगी

griffon-vulture-found-in-sahyadri-tiger-project-recorded-first-time

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT