सातारा : सातारा जिल्हा म्हणजे क्रांतीकारी अन् सैनिकी वारसा असलेला जिल्हा. त्याचबरोबर खाद्यपदार्थांमध्ये सातारी कंदीपेढा तर जगविख्यात प्रसिध्द आहे. त्याच बरोबर पुस्तकांचे गाव भिलार, चित्रांचे गाव जकातवाडी यांसारख्या अनेक कलागुणांनी प्रसिध्द असलेला हा सातारा, आता नव्या एका उपक्रमाने ओळखला जावू लागला आहे. पांगारे येथील सर्जेराव जाधव व त्यांच्या सौभाग्यवती यांच्या कल्पतेने केवड्याच्या टोप्या ह्या साता-याची नवी ओळख होवू पाहत आहेत.
कोरोना या महामारीने अनेकांची आयुष्य बदलून टाकली असली तरी काहींनी स्वत:च्या हिमतीवर अन् कल्पनेतून नवनवीन क्षेत्रातून उभारी घेत स्वत: सह इतरांनाही रोजगार निर्मिती करुन दिली. असेच काहीसे उदाहरण म्हणजे पांगारे (ता. सातारा) येथील मूळ रहिवासी सर्जेराव जाधव हे वसई येथे शिलाई गारमेंटमध्ये कार्यरत होते. गेल्या अनेक वर्षांपासून जाधव हे या क्षेत्रात असल्याने ते या कलेत निपून झाले होते, परंतु कोरोनाच्या महामारीत यांच्याही नोकरी व्यवसायाला आर्थिक फटका बसला अन् आर्थिक मार्ग बंद झाल्याने यांनाही आपल्या गावाचा रस्ता धरावा लागला.
सातारा जिल्ह्यातील पांगारे हे गाव तसे दुर्गमच या ठिकाणी भौतिक-सुविधांचा वाणवा दिसून येतो. याठिकाणी प्रामुख्याने शेती व्यवसाय केला जातो. त्यातूनच मार्ग काढत खचून न जाता आपले वडील केवड्याच्या सहाय्याने इरले तयार करायचे याच माध्यमातून काही नवीन करता येत का पाहता-पाहता टोपीची संकल्पना आल्यावर जाधव कुटुंबीयांनी ही कल्पना अपार कष्टातून सत्यात उतरवून एक अनोख्या केवड्याची टोपी बाजापेठेत आणली. केवड्याची एक टोपी तयार करण्यासाठी केवड्याचे काटे काढून जवळपास 5 तास तर 22 ते 26 मीटर लांब वेणीची आवश्यकता असते. गावातील अनेकांनी सर्जेराव जाधव यांच्या कामाच्या सुरुवातीला प्रशंसा केली तर कोणी निंदा, परंतु कोणतीही तमा न बाळगता ठरवलेले ध्येय निश्चित करण्याचा जाधव कुटुंबीयांचा मानस होता. तसेच या प्रसंगात पांगारे गावचे माजी सरपंच विठ्ठल पावार यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत होते. थंड आणि सुगंधी अशा केवड्याच्या टोप्या ह्या जस-जशा गावांमध्ये दिवसू लागल्या तशी मागणीही दिसून येत आहे. तसेच मोठी टोपी 300 रुपये, तर छोटी कॅप टोपी 200 रुपये अशा अल्पदरात असल्याने अनेकांच्या पसंतीस ही केवड्याची टोपी उतरत आहे.
उन्हापासून होणार बचाव
केवड्याची टोपी हा व्यवसाय घरातील दोघांनी मिळून जरी सुरुवात केली असली, तरी या व्यवसायाने व्यापक स्वरुप घेतल्यास गावात रोजगार निर्मिती ही होणार असल्याने पांगारे गाव हे केवड्यांच्या टोपीचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे. तसेच या टोप्या 12 तास पाण्यात ठेवल्या असता 4 ते पाच दिवस टोपी थंड राहते यामुळे उन्हात काम करत असताना डोळ्यांची जळजळ, उन्हाळे या पासून मुक्तता मिळते. केवड्याच्या टोप्या ह्या म्हसवे शेतकरी हॉमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
-सर्जेराव जाधव, पांगारे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.