सातारा

साताऱ्यातील प्रस्तावित चौपाटीवर मटकाबुकीचे राज्य; पोलिसांसह पालिकेचे दुर्लक्ष

गिरीश चव्हाण

सातारा : साताऱ्याच्या राजवाड्यासमोरील चौपाटी स्थलांतरासाठी तयार केलेल्या जागेचा ताबा मटकाबुकीने घेतला आहे. टपरीच्या आडोशाने सुरू असलेल्या मटक्‍याकडे नगरपालिकेसह शाहूपुरी पोलिसांचे दुर्लक्ष आहे. जागावाटप होण्यापूर्वीच जागा बळकावत मटकाबुकी दररोज मालामाल होत असून, चौपाटीवरील व्यावसायिक मात्र पालिकेच्या चुकीच्या कारभारामुळे बेहाल झालेत.

राजवाड्यासमोरील मोकळ्या जागेत 40 वर्षांहून अधिक काळ चौपाटी सुरू होती. नंतरच्या काळात चौपाटी विस्तारली आणि त्या ठिकाणच्या व्यावसायिकांची संख्या 105 च्या घरात गेली. राजवाड्यासमोरील ही चौपाटी स्थलांतरीत करण्याचा निर्णय सातारा नगरपालिकेने घेत पर्यायी जागेचा शोध सुरू केला. शोधाअंती चौपाटीसाठी त्याच परिसरातील आठ गुंठे जागा निवडण्यात आली. निवडलेल्या जागेचे सपाटीकरण केल्यानंतर त्याठिकाणी प्रत्येक व्यावसायिकाला खाद्यगाडे लावण्यासाठी किती जागा द्यायची, याचा आराखडाही तयार करण्यात आला. जागेची मोजमापे व आखणी झाल्यानतंर नवीन जागेत 72 गाडेच बसणार असल्याचे समोर आले. कमी व्यावसायिकांना नवीन जागेत स्थान मिळणार असल्याने चौपाटीवरील व्यावसायिकांच्यात दोन गट निर्माण झाले.

राष्ट्रवादीला धूळ चारणा-या विलासकाकांचे सोनिया गांधींनी केले हाेते काैतुक 

महाबळेश्वर : कर्जाच्या फसवणुकप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या एकास अटक; औरंगाबादच्या एकाचा शाेध सुरु 

एक गट चौपाटीसाठी दुसरी जागेच्या मागणीवर, तर दुसरा गट पालिकेने निवडलेल्या जागेवर व्यवसाय सुरू करण्यावर अडून बसला. जागा वाटपाचा निर्णय रेंगाळला असतानाच चौपाटीच्या जागेत एका मटकाबुकीने शिरकाव केला. एक कोपरा अडवत त्या ठिकाणी बुकीने टपरी टाकत मटका घेणे सुरू केले आहे. राजरोस सुरू असणाऱ्या मटक्‍याकडे शाहूपुरी पोलिसांसह पालिकेचे दुर्लक्ष आहे. दहा महिन्यांहून अधिक काळ चौपाटी बंद असल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे.


व्यावसायिकांत दोन गट

राजवाडा चौपाटीच्या स्थलांतरावरून व्यावसायिकांत दोन गट तयार झाले आहेत. त्यामुळे नगरपालिकेने चौपाटीवरील जागांचे सोडतपद्धतीने वाटप करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेऊन दोन महिने झाले तरी जागेचे वाटप न झाल्याने चौपाटी व्यावसायिकांत अस्वस्थता आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मानखुर्द विधानसभेत नवाब मलिक पिछाडीवर, अबू आझमी आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT