भाजप सरकारने (BJP Government) तळागाळातील लोकांपर्यंत पोचत देशाचा विकास केला. देशात मोठमोठे रस्ते, घरे नसणाऱ्यांना घरे, पाणी, वीज अशा जनतेच्या अनेक समस्या भाजपने सोडविल्या आहेत.
मेढा : देशाची सत्ता २०१४ मध्ये भाजपकडे (BJP) आल्यावर खऱ्या अर्थाने देशाची परिस्थिती बदलली. काँग्रेस सरकारच्या काळातील भ्रष्टाचारामुळे देशाची अर्थव्यवस्था कमकुवत झाली होती. नवमतदारांवर राष्ट्रनिर्माणाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री अमितकुमार मिश्रा (Amit Kumar Mishra) यांनी केले.
या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinghraje Bhosale), सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी अतुल भोसले, भाजपचे विक्रम पावसकर, नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. या वेळी भाजप युवा वॉरिअर्स शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी गृहराज्यमंत्री मिश्रा बोलत होते.
गृहराज्यमंत्री मिश्रा म्हणाले, ‘‘स्वच्छ चारित्र्याचा पंतप्रधान देशाला मिळाल्यामुळे देश आज एका विकासाच्या विशिष्ट पातळीवर पोचला आहे. भाजप सरकारने (BJP Government) तळागाळातील लोकांपर्यंत पोचत देशाचा विकास केला. देशात मोठमोठे रस्ते, घरे नसणाऱ्यांना घरे, पाणी, वीज अशा जनतेच्या अनेक समस्या भाजपने सोडविल्या आहेत. राज्यमार्ग, राष्ट्रीय मार्ग, रेल्वे, विमान व्यवस्था आणि सर्वात घातक ठरलेल्या कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठीही भाजपने खूप मोलाची भूमिका बजावली आहे.’’या पुढील काळात नवमतदारांचे मतदान हे राष्ट्रनिर्माणात महत्त्वाची भूमिका बजावणारे असेल. त्यासाठी मतदारांनी समजूतदारपणे मतदान केले पाहिजे, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘‘आजपर्यंत कोणतेच केंद्रीय मंत्री निवडणूक नसताना आपल्याला भेटायला आले नव्हते. मात्र, भाजपचे विचार तळागाळापर्यंत पोचावेत, तसेच नरेंद्र मोदींचे विचारही सर्वांपर्यंत पोचावेत, यासाठी आज गृहराज्यमंत्री मिश्रा हे जनतेसोबत संवाद साधण्यासाठी लोकसभा प्रवास दौरा करत आहेत. टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे. मात्र, त्याकडे लक्ष न देता समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी आपण काम करत राहायचे आणि त्यासाठी तरुणांचे सहकार्य अपेक्षित आहे.’’ या वेळी भाजपचे जावळी तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, सौरभ शिंदे, कांतिभाई देशमुख, पांडुरंग जवळ, जयदीप शिंदे, दत्ता पवार, गीता लोखंडे, विठ्ठल देशपांडे आदी उपस्थित होते. विकास देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.