Jyoti Mate and Sarthak Mate sakal
सातारा

HSC SSC Exam Result : आईचे बारावीत, तर लेकाचे दहावीत यश; नोकरी सांभाळत १८ वर्षांनंतर दिली परीक्षा

पिराचीवाडी, आसले (ता. वाई) येथील मायलेकराने एकाच वर्षी बारावी आणि दहावीच्या परीक्षेत यश मिळवले.

विलास साळुंखे

पाचवड - पिराचीवाडी, आसले (ता. वाई) येथील मायलेकराने एकाच वर्षी बारावी आणि दहावीच्या परीक्षेत यश मिळवले. आईने सतरा वर्षांनंतर पुन्हा वह्या-पुस्तके उघडून बारावीच्या परीक्षेत यश मिळवले, तर मुलानेही दहावीच्या परीक्षेत उत्तम गुणांनी पास होत आईच्या यशात आनंदाची भर टाकली आहे.

ज्योती संजय माटे यांनी अठरा वर्षांपूर्वी शाळा सोडली होती. आपण बारावी तरी पास व्हायला पाहिजे होते, असे त्यांना कायम वाटत असे. बघता बघता मुलगा दहावीच्या वर्गात गेला आणि त्यांनीही जिद्दीने यंदा बारावीच्या परीक्षेला सामोरे जाण्याचा निर्धार केला.

विशेष म्हणजे शिरवळ येथील खासगी कंपनीतील नोकरी, तसेच घरातील सर्व जबाबदारी पार पाडून ज्योती यांनी जिद्दीने अभ्यास करून बारावीच्या परीक्षेला त्या आत्मविश्वासाने सामोऱ्या गेल्या. त्यांच्या मेहनतीला फळ आले. त्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या आनंदात मोठी भर टाकली ती त्यांचा मुलगा सार्थक याने. त्यानेही दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवले. बारावी आणि दहावीच्या परीक्षेत एकाच वर्षी यशस्वी मायलेकरांचे परिसरात कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT