Satara 
सातारा

हातगाड्यावरून केला शेकडो किलोमीटर प्रवास!, कोरोनाच्या भीतीने गाठले गाव

कृष्णत साळुंखे

चाफळ (जि. सातारा) ः जगभरात कोरोनातून जीव वाचवण्यासाठी सर्वांची धडपड सुरू आहे. तशीच डोंगराच्या कुशीत वसलेल्या कोळेकरवाडी येथील कोळेकर कुटुंबाने केलेली धडपडही अनेक अर्थाने महत्त्वाची वाटते. चिल्यापिल्यांना हातगाड्यावरून ढकलत शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत गाव गाठणाऱ्या कोळेकर कुटुंबीयांचा थक्क करणारा प्रवास अंगावर शहरे आणतो. 

कोळेकरवाडी जेमतेम लोकवस्तीचे छोटेखाणी गाव. त्या छोट्याशा वाडीतील आनंदा ऊर्फ आण्णा दादासाहेब कोळेकर ठाणे जिल्ह्यातील दिवा येथे एका गारमेंट कंपनीत नोकरीस होते. पत्नी सुनीता, दहा वर्षांची मुलगी, आठ व सहा वर्षांची दोन मुले असा त्यांचा परिवार आहे. कोरोनाचे थैमान सुरू झाल्यामुळे मालकाने गारमेंट कंपनी बंद केली. परिस्थिती सुधारेल भाबड्या आशेवर मुंबईत दोन महिने थांबलेल्या कुटुंबाकडे खर्चाला पैसेही उरले नाहीत, होते नव्हते ते सारे संपले, आता काय करायचे हाच खरा मोठा प्रश्न होता. या वेळी पती- पत्नीने कोणत्याही परिस्थितीत शेकडो मैलावरील आपला गाव गाठायचा निर्णय घेतला. आनंदा यांनी एका भैयाचा हातगाडा घेतला. त्यावर साहित्याच्या बॅगा ठेवल्या. तीन मुलांना गाड्यावर बसवून पती- पत्नीने रविवारी (ता. 17) पहाटेच्या सुमारास पायी प्रवासास सुरुवात केली. पायी प्रवास करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागणार असल्याची दोघांनीही मानसिकता करून घेतली होती, तरीही काहीही झाले, तरी गाव गाठायचा निर्णय मात्र ठाम ठेवला होता. रोज किमान 50 किलोमीटरचा प्रवास करत होते. त्यांनी अशाच प्रवासाचा टप्पा एकमेकांना आधार देत पार केला. पनवेल, खोपोली, तळेगाव, धनगरवाडी, भुईंज, आनेवाडी असे प्रवासातील मुक्कामाचे टप्पे पार करीत सातव्या दिवशी हे कुटुंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पोचले. त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी करून ते रात्री नऊ वाजता कोळेकरवाडी या आपल्या गावी पोचले. कुटुंबाचा मुंबईहून गावापर्यंतचा सात दिवसांचा हातगाडा ढकलत झालेला पायी प्रवास अक्षरशः अंगावर शहारे आणणारा आहे. कुटुंबासाठी गावनजीकच क्वारंटाइनची सोय केली आहे. काळजी घेत आहेत. कुटुंबीयांचा जीव वाचवण्यासाठी शेकडो मैल जमीन पायी घालून आपला गावात पोचलेल्या या कुटुंबासाठी मदतीचे हात पुढे येणे गरजेचे आहेत. 

साधी विचारपूसही नाही... 

विभागातील कोळेकरवाडी येथील कोळेकर कुटुंब मोठ्या हालअपेष्टा सहन करत जिवाच्या आकांताने गावाकडे मुला- बाळांसह पायी चालत आले असताना कुटुंबाची साधी विचारपूस अथवा दखलही कोणत्याच राजकर्त्यांनी घेतलेली नाही. केवळ निवडणुकीपुरते डोंगरावरील लोकांचा वापर करणाऱ्या या नेत्यांना कुणाचे काहीही देणे-घेणे नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट दिसून येत असून, सर्वसामान्य जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT