Jayant Patil vs Chandrakant Patil  esakal
सातारा

चंद्रकांतदादांना हिमालयापर्यंत मी सोडायला जाईन : जयंत पाटील

सकाळ डिजिटल टीम

'आगामी निवडणुकीत भाजप-मनसेची युती झाली तरीही फार परिणाम होणार नाही.'

सातारा : जिल्ह्यातील दोन्ही राजे राष्ट्रवादीतून (NCP) भाजपत (BJP) गेले तरीही कार्यकर्ते राष्ट्रवादीतच आहेत. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा प्रभाव नव्हता, तेथे आता कार्यकर्ते संघटितपणे काम करणार असल्याचे सांगत गतवेळीपेक्षा आगामी निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार वाढतील, असा विश्‍वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा साताऱ्यात दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी भवनात जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘‘मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे कोणाच्या हातचे बाहुले आहेत, हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांनी भाजपची सत्ता असलेल्या गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक येथील मशिदीवरील भोंगे उतरले आहेत का, ते आम्हाला कळवावे, अशी खोचक टीका राज ठाकरेंवर श्री.पाटील यांनी केली. याचबरोबर सातारा तालुक्यातील सभासद नोंदणी पुढील महिन्यात पूर्ण करणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने एकत्रित निवडणुका लढवाव्यात का, याबाबत स्थानिक नेतृत्वांना अधिकार दिले आहेत. आमचे प्राधान्य महाविकास आघाडीने एकत्रित निवडणुका लढवाव्यात, यालाच असणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यावर मंत्री पाटील म्हणाले,‘‘ महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.’’

दरम्यान, पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रा सुरू असून, ही यात्रा जिल्ह्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांशी राष्ट्रवादी भवनात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar), पालकमंत्री बाळासाहेब पाटील, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde), आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सलक्षणा सलगर आदी उपस्थित होते.

हिमालयात सोडायला जाईन

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीतील भाजपचा पराभव झाल्यास हिमालयात जाईन, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले होते. या वक्तव्याची खिल्ली उडवत जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना सोडायला हिमालयापर्यंत मी जाईन, असे सांगत सध्या महाराष्ट्रात उकाडा वाढला आहे. त्यामुळे तिकडे जरा बरे वाटेल, असा चिमटाही जयंत पाटील यांनी काढला.

नकलाकार म्हणून राज ठाकरे आवडतात

राज ठाकरे भाषणे करून जातीत तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जास्त बोलण्यासारखे काहीच नाही. त्यांना नक्कल करणे चांगले जमते. चांगला नकलाकार म्हणून ते मला फार आवडतात. आगामी निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती झाली तरीही फार परिणाम होणार नाही. उलट मुंबईमध्ये त्याचा तोटा मनसेला होईल, अशी शक्यता पाटील यांनी वर्तविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

SCROLL FOR NEXT