सातारा

दुरुस्त्या न करताच पूल वाहतुकीसाठी खुले! दुर्घटनेची भीती

राजेश पाटील

काही ठिकाणचे पूल मात्र तुटलेल्याच स्थितीत असल्याने त्यावरून सुरू असलेली वाहतूक अपघाताला निमंत्रण देत आहे.

ढेबेवाडी (सातारा): अतिवृष्टीत महापुराच्या तडाख्याने विभागातील अनेक ठिकाणचे नदी व ओढ्यांवरील लहान- मोठे पूल उद्‌ध्वस्त झाले. बांधकाम विभागाने काहींची तात्पुरती दुरुस्ती केलेली असली, तरी काही ठिकाणचे पूल मात्र तुटलेल्याच स्थितीत असल्याने त्यावरून सुरू असलेली वाहतूक अपघाताला निमंत्रण देत आहे.

महापुराच्या तडाख्याने दळणवळणाचा महत्त्वाचा आधार असलेले पूल उद्‌ध्वस्त झाल्याने अनेक गावे तब्बल १५ ते २० दिवस संपर्कहीन झालेली होती. उघडिपीनंतर बांधकाम विभागाने तातडीने तुटलेल्या पुलावर मुरूम, माती, दगड आणि पात्रातील वाळूचा भराव टाकून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, तरीही अजूनही अनेक ठिकाणी वर्दळीच्या रस्त्यावरील तुटलेले फरशी पूल, मोठे पूल धोकादायक स्थितीतच आहेत. विशेषतः काळगाव- गुढे रस्त्यावर तुटलेल्या फरशी पुलाचा अंदाज येत नसल्याने अपघाताची भीती आहे.

ढेबेवाडी- पाटण मार्गावरील मंद्रुळकोळे जवळच्या वांग नदीवरील जुन्या पुलाची स्थिती अत्यंत धोकादायक बनलेली असतानाही बांधकाम विभागाने तेथे कोणतीही उपाययोजना न करता वाहतूक सुरूच ठेवली आहे. त्याशिवाय अन्य ठिकाणच्या अनेक पुलाचीही अशीच अवस्था आहे. वाल्मीक पठार, कसनी, जिंती, सळवे आदी परिसरातील पुलांची दुरुस्ती, नूतनीकरण आदी कामे तातडीने हाती न घेतल्यास हे पूल मोठ्या दुर्घटनेचे कारण बनतील, अशीही भीती आहे.

काळगाव- गुढे रस्त्यावरील फरशी पुलांची अतिशय धोकादायक अवस्था झाली आहे. पूल तुटलेले असतानाही तेथे सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना न केल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

- ॲड. विठ्ठलराव येळवे, येळेवाडी- काळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT