satara sakal media
सातारा

Satara : कोविड योद्ध्यांचे कार्य प्रेरणादायी : प्रदीप विधाते

कोरोनाच्या काळात आशा आणि अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी समाजच आपले कुटुंब समजून जिवावर उदार होऊन काम केले

राजेंद्र शिंदे

खटाव : कोरोनाच्या काळात आशा आणि अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी समाजच आपले कुटुंब समजून जिवावर उदार होऊन काम केले. त्यांचे बाधितांना धीर देण्याचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी केले. खटावचे ज्येष्ठ पत्रकार आणि माजी सरपंच एम. आर. शिंदे यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त वीरपत्नी कोमल राऊत यांच्या हस्ते कोविड योद्धांच्या सन्मान कार्यक्रमात विधाते बोलत होते. या वेळी लेखक आणि निर्माते तेजपाल वाघ, भूजलतज्ज्ञ विलास भोसले, अरुण आदलिंगे प्रमुख म्हणून उपस्थित होते.

विधाते म्हणाले, ‘‘अनेकांचे सामाजिक आणि राजकीय गुरू असणाऱ्या एम. आर. शिंदे सरांच्या स्मृती विधायक उपक्रम राबवून जपण्याचे काम गेली २६ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. सरांच्या स्मृती जतन होत असल्याने पुढच्या पिढ्यांना समाजकारणाचे बाळकडू मिळत आहे. त्यांनी आदर्श सरपंच, परखड पत्रकार, कडक शिक्षक या भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम केले. नवीन पिढीला त्यांचे विचार समजावेत म्हणून हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे.’’

तेजपाल वाघ म्हणाले, ‘‘गेली २६ वर्षे एम. आर. शिंदे सरांच्या स्मृती जतन केल्या जात आहेत. त्यांच्या विचारांची ज्योत अनेकांना प्रेरणा देते. कोरोना योद्ध्यांचा सन्मान करताना प्रत्येकाचा ऊर भरून येत आहे. ’’

कार्यक्रमात वीरपत्नी कोमल राऊत यांचाही सन्मान करण्यात आला. पत्रकार अविनाश कदम यांनी सूत्रसंचालन केले. किशोर कुदळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राचार्य रामचंद्र कोरडे, माजी सरपंच बबनराव घाडगे, रसूलभाई मुल्ला, विजय बोबडे, किशोर डंगारे, मनोज देशमुख, विजय बोर्गे- पाटील, प्रकाश जाधव, ॲड. एम. ए. काझी, नितीन सावंत, रमेश अडसूळ, रमेश शिंदे, अमिन आगा, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahajibapu Patil: काय झाडी काय डोंगर... फेम शहाजीबापू पाटील यांचा पराभव करणा-या युवा आमदाराने केली अनोखी घोषणा

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

Latest Maharashtra News Updates : कोकण कधीच ठाकरेंचं नव्हतं- निलेश राणे

SCROLL FOR NEXT