कऱ्हाड (सातारा) : पालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत नगराध्यक्षा रोहिणी शिंदे (Mayor Rohini Shinde) यांनी खोटी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास दिली आहे, अशी तक्रार जनशक्ती आघाडीने (Janshakti Aghadi) जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांच्याकडे केली आहे. अर्थसंकल्पाच्या बैठकीत जी चर्चा झाली, त्याचे रेकॉर्डिंग झाले आहे. त्यानुसार नगराध्यक्षांनी ठराव दिलेला नाही, असा अहवाल मुख्याधिकारी रमाकांत डाके (Chief Officer Ramakant Dake) यांनीही जिल्हाधिकारी सिंह यांना दिला आहे. त्यामुळे ‘जनशक्ती’च्या तक्रारीसह मुख्याधिकाऱ्यांचा अहवाल अशा दुहेरी स्थितीत जिल्हाधिकारी अर्थसंकल्पासह नगराध्यक्षांबाबत काय निर्णय घेणार, याकडे सध्या राजकीय लक्ष लागले आहे. (Janshakti Aghadi Alleges That Mayor Rohini Shinde Gave False Information About The Budget Of The Municipality Satara Political News)
पालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी खोटी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास दिली आहे.
पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प २५ फेबुवारी रोजी पालिकेच्या विशेष सभेत (Karad Municipal Special Meeting) सुहास जगताप यांनी मांडला. त्यास विद्या पावसकर यांनी अनुमोदन दिले. जनशक्ती आघाडीच्या सदस्यांनी त्याला विरोध केला होता. त्यावरून चार महिने राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. जनशक्ती आघाडीने जिल्हाधिकारी सिंह यांच्याकडे तक्रार दिली आहे. त्यात ‘जनशक्ती’ने उपसूचनेव्दारे अर्थसंकल्प सादर केला. बहुमताने मंजुरी मिळाली होती. तरीही बैठकीतील वस्तुस्थिती डावलून नगराध्यक्षा शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला एकमताने अर्थसंकल्प मंजूर झाल्याचे खोटे लेखी कळविले आहे, असा ‘जनशक्ती’ने आरोप केला आहे. नगराध्यक्षांच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारीवर नक्की काय निर्णय होणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे.
नगराध्यक्षांनी खोटी माहिती दिल्याने कारवाईची मागणी केल्याने त्या तक्रारीला राजकीय वजन प्राप्त झाले आहे. तक्रारीत खोटी माहिती देऊन नगराध्यक्षांनी लोकशाहीची, नगरसेवकांची, जिल्हाधिकारी कार्यालयाची व कऱ्हाडकरांची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार, तेही महत्त्वाचे आहे. ‘जनशक्ती’च्या तक्रारीशिवाय मुख्याधिकारी डाके यांनीही अर्थसंकल्पाबाबत स्वतंत्र अहवाल दिला आहे. त्यात त्यांनी अर्थसंकल्पाच्या बैठकीत जी चर्चा झाली, त्यानुसार नगराध्यक्षांनी ठराव दिलेले नाहीत, असाही स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाबाबत (Karad Municipal Budget) जिल्हाधिकारी लवकरच सारासार अहवाल बघून निर्णय देतीलही. मात्र, तो निर्णय काय असेल, याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
अर्थसंकल्पाच्या सभेची खोटी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना नगराध्यक्षांनी दिली आहे. बैठकीत झालेल्या चर्चेबाबतचा त्यांनी यापूर्वी दिलेला ठराव व त्यांनी नंतर अलीकडे बदलून दिलेला ठराव याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीच्या स्वरूपात गटनेते राजेंद्र यादव यांनी दिलेली आहे. त्यामुळे सभागृहातील वस्तुस्थितीबाबत जिल्हाधिकारी सिंह लवकरच योग्य निर्णय घेतील, असा विश्वास आहे.
विजय वाटेगावकर, आरोग्य सभापती, कऱ्हाड
पालिका अर्थसंकल्पाच्या बैठकीत जी चर्चा झाली, त्याचे पालिकेत जे रेकॉर्डिंग आहे, त्या रेकॉर्डिंगनुसार नगराध्यक्षांनी ठराव दिलेला नाही. त्यामुळे त्या वस्तुस्थितीचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला आहे. त्यावर योग्य निर्णय निश्चीत होईल.
रमाकांत डाके, मुख्याधिकारी, कऱ्हाड
Janshakti Aghadi Alleges That Mayor Rohini Shinde Gave False Information About The Budget Of The Municipality Satara Political News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.