कऱ्हाड (सातारा) : जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी मंजूर केलेला २७० कोटींचा अर्थसंकल्प हाच आमचा नैतिक विजय आहे. शहराच्या विकासावर फोकस ठेवून तो तयार केला होता, अशी माहिती जनशक्ती आघाडीचे (Janshakti Aghadi) गटनेते राजेंद्र यादव (Rajendra Yadav) यांनी दिली. कॉंग्रेसच्या (Congress) कुबड्यावर राजकारण करणाऱ्या भाजपमधील (BJP) पावसकर गटाने आमच्या बहुमतासह अर्थसंकल्पाच्या अभ्यासाची मापे काढू नयेत, असा टोलाही यादव यांनी लगावला.
कॉंग्रेसच्या (Congress) कुबड्यावर राजकारण करणाऱ्या भाजपमधील (BJP) पावसकर गटाने आमच्या अर्थसंकल्पाच्या अभ्यासाची मापे काढू नयेत.
यादव पुढे म्हणाले, जनशक्तीने उपसूचनेद्वारे मांडलेला अर्थसंकल्प (Karad Municipal Budget) मंजूर आहे. कोरोना महामारीमुळे (coronavirus) लोक अडचणीत असल्याने कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकसल्प स्थायी समितीत मंजूर झाला. मात्र, त्यात करवाढ सुचवल्याने आम्ही विशेष सभेत ते नाकारले. त्यावेळी आम्ही उपसूचना मांडून २७० कोटींचा अर्थसंकल्प मांडला, तर भाजपने १३४ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. त्यास अनुमोदनही देण्यात आले होते. मग त्यात भाडेवाढ कशी झाली, हा प्रश्न आहे. वाईट झाले की प्रशासनाने केले, अशी भूमिका नगराध्यक्षा (Mayor Rohini Shinde) आणि भाजप सतत घेत आहे. १३४ कोटींच्या अर्थसंकल्पाला विरोध करत स्मार्ट सिटीच्या संकल्पानुसार, २७० कोटींच्या मांडलेल्या अर्थसंकल्पाने नुकसान झालेले नाही. शहराला वाढीव निधी मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. स्मार्ट सिटीच्या स्वप्नांची धमक आहे. मात्र, ते आमच्या अर्थसंकल्पाला विरोध करत विकासाच्या आडवे येत आहेत.
त्यांचा विलंब आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत आहेत. पावसकरांनी जनशक्ती बहुमतात आहे की, नाही याची काळजी पावसकरांनी करू नये. भाजपचं कसं चाललंय, ते पाहावं. पहिल्या सहा महिन्यातच स्थायीच्या बैठकीत नगराध्यक्षांना रडायला लावणारे आता त्यांची बाजू उचलत आहेत. त्यांना फिरस्ती कोण म्हणाले, उचापती कॉन्ट्रक्टरचे संबोधन कोणी लावले, याचा विचार केला तर तुम्हालाच सगळं समजेल. जनशक्तीच्या बहुमताचे आम्ही पाहून घेवू. विरोध भाजपला नाही, तर पावसकर गटाला आहे. भाजपमध्ये अनेक निष्ठावंत असतानाही केवळ स्थायीत जाता यावे, यासाठी त्यांनी फारूक पटवेकरांना स्वीकृत का केले, याचंही उत्तर द्यावं.
काजू कतलीचे कारले का झाले?
मुख्याधिकारी यशवंत डांगेंच्या बदलीनंतर पालिकेत काहींनी काजू कतली वाटून आनंद व्यक्त करत मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचे स्वागत केले. तेच डाके त्यांना आता वाईट कसे झाले. काजू कतलीचे कारले कसे झाले. डाके चुकीचे आणि एकच माणूस सतत बरोबर असे कसे असू शकते?, असा सवालही यादव यांनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.