railway crossing esakal
सातारा

पुणे-मिरज लोहमार्ग बंद ठेवण्याचे आदेश; 15 जून पर्यंत काम करा

ऋषीकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : खटाव-माणसारख्या (khatav-mann) दुष्काळी भागासाठी (drought area) अतिमहत्त्वाच्या जिहे-कठापूर उपसा जलसिंचन (jihe-kathapur-scheme) प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सद्य:स्थितीत रेल्वे क्रॉसिंगच्या (railway-crossing) अडचणीमुळे या प्रकल्पाचे काम रखडले होते. या कामाला रेल्वे मंत्रालयाकडून (railway ministry) हिरवा कंदील मिळाल्याने प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण होणार असून दुष्काळी जनतेचे कित्येक वर्षांचे स्वप्न साकार होणार असल्याची माहिती लक्ष्मणराव इनामदार (laxmanrao inamdar) लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. (jihe-kathapur-scheme-final-stage-railway-crossing-may-closed-till-15-june)

याबाबत पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता, केंद्रीय जलआयोगाची परवानगी, तसेच "अनुशेषा'मधून हा प्रकल्प बाहेर काढणे, प्रकल्प प्राधान्य क्रमामध्ये ठेवणे ही सर्व कामे केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे झाली. त्यासाठी आवश्‍यक असलेल्या निधीची भरीव तरतूद केंद्र व तत्कालीन युती सरकारने वारंवार केली. तत्कालीन जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या प्रयत्नातून या योजनेला नाबार्डचे (nabard) अर्थसाह्य मिळाले. हा प्रकल्प रेल्वे क्रॉसिंगच्या अडचणीमुळे रखडला होता. लोहमार्गाखालून येणारी पाइपलाइन अधांतरीच होती. त्यासाठी आवश्‍यक असलेले सर्व काम दोन्ही बाजूंनी पूर्ण केले गेले होते. परंतु, रेल्वे मंत्रालयाची परवानगी नसल्याने या कामासाठी पुणे-मिरज लोहमार्ग वाहतूक बंद करून क्रॉसिंग करता येत नव्हते. त्यासाठी विशेष परवानगीची गरज होती.

ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन रेल्वेमंत्री पियुष गोयल (piyush goel) यांच्या मंत्रालयाबरोबर केलेल्या पाठपुराव्यामुळे या कामाला मंजुरी मिळाली. क्रॉसिंगचे काम पूर्ण करण्यासाठी दिनांक 1 जून ते 15 जून 21 पर्यंत गरजेप्रमाणे लोहमार्ग बंद करून काम पूर्ण करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.

नरेंद्र माेदी त्यांचे गुरु लक्ष्मणराव इनामदार यांनी अभिवादन करताना.

बंधारा, पंपहाउस, पाइपलाइनचे काम पूर्ण

जिहे-कठापूर येथील बॅरेज बंधाऱ्याचे काम 100 टक्के पूर्ण असून या योजनेच्या पंपहाउसचे कामसुद्धा पूर्णत्वास गेले आहे. जिहे-कठापूर ते नेर धरण संपूर्ण 23 किलोमीटरची पाइपलाइन वर्धनगड घाट बोगद्यासह शंभर टक्के पूर्ण झाली आहे. या योजनेस आवश्‍यक असणारा 40 केव्हीए विद्युतपुरवठा प्राधान्याने मंजूर करण्यात येऊन तो अंतिम टप्प्यात आहे. पाइपलाइन चाचणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे लवकरच कृष्णेचे पाणी येरळेला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावामुळे योजनेच्या रखडलेल्या कामांना खऱ्या अर्थाने गती मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT