dam  sakal
सातारा

Satara : यंदा कास भरणार तुडूंब

भिंतीचे काम अंतिम टप्‍प्‍यात : तलावातील पाणीसाठा होणार अर्धा टीएमसी

सकाळ वृत्तसेवा

सातार - सातारा शहराचा जलदाता असणाऱ्या कास तलावाच्‍या भिंतीची उंची वाढविण्‍याचे काम अंतिम टप्‍प्‍यात आले आहे. हे काम येत्‍या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्‍याचा चंग बांधण्‍यात आला असून, त्‍यानंतर पडणाऱ्या पावसाचा थेंब याठिकाणी साठला जाणार आहे. नवीन भिंतीमुळे या ठिकाणचा पाणीसाठा अर्धा टीएमसी इतका होऊन तलाव तुडूंब भरणार आहे.

सातारा शहराला पूर्वापार कास तलावातून पाणीपुरवठा करण्‍यात येत आहे. उघड्या पाटातून येणारे पाणी नंतरच्‍या काळात बंदिस्‍त वाहिनीतून साताऱ्यात आणण्‍यात येऊ लागले. वाढणारी लोकसंख्‍या नजरेसमोर ठेवत या तलावाच्‍या भिंतीची उंची वाढविण्‍याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्‍प पालिकेने हाती घेतला होता. यानुसार हे काम पालिकेच्‍या वतीने हाती घेण्‍यात आले. यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी दिला असून, त्‍यातून सुरू असणारे काम सध्‍या अंतिम टप्‍प्‍यात आहे.

नवीन भिंत बांधण्यापूर्वी असणाऱ्या भिंतीमुळे त्‍याठिकाणी ०.१ टीएमसी इतका साठा होत होता. नवीन कामादरम्‍यान जुन्‍या भिंतीपेक्षा १२ मीटर उंच असणारी भिंत बांधण्‍यात आली असून, त्‍यामुळे तेथील पाणीसाठा अर्धा टीएमसी इतका होणार आहे. वाढणाऱ्या पाणीसाठ्याचा पुरेपूर वापर व्‍हावा, तसेच त्‍याठिकाणाहून येणाऱ्या पाण्‍याची आवक वाढावी, यासाठी जलवाहिनी बळकटीकरणाचे काम देखील आगामी काळात पालिकेच्‍या वतीने हाती घेण्‍यात येणार आहे. सद्यःस्‍थितीत तेथील काम अंतिम टप्‍प्‍यात असून, हे काम येत्‍या सात जूनपूर्वी पूर्ण करण्‍यासाठी सर्व यंत्रणा त्‍याठिकाणी कार्यरत आहे.

हे काम पूर्ण झाल्‍यानंतर नवीन भिंतीमुळे त्‍याठिकाणचा पाणीसाठा ६० फुटांपर्यंत होणार आहे. यंदाच्‍या पावसाळ्यात याठिकाणी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्‍यासाठीचे नियोजन पालिका आणि पाणीपुरवठा विभाग करत आहे. तलावात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्‍यानंतर काससह इतर गावांना जोडणारा रस्‍ता पाण्‍याखाली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kashinath Date: पारनेरमध्ये लंकेंच्या गडाला सुरुंग लावणारे काशिनाथ दाते कोण? काय होती रणनीती?

Latest Marathi News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल

Weight Gain Problem : मुलांपासून प्रौढांमध्ये लठ्ठपणामुळे वाढती समस्या, आरोग्यावरील गंभीर परिणाम आणि उपाय...जाणून घ्या

Ahilyanagar Crime : पाळीव 'पोपट' मारला; तिघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, तीन महिन्याच्या शिक्षेसह 500 रूपये दंड

Maharashtra CM : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? ही आहेत ५ मोठी कारणे

SCROLL FOR NEXT