karad airport expansion night landing system completed within year shambhuraj desai sakal
सातारा

Satara News : कऱ्हाड विमानतळ विस्तारीकरण, नाईट लँडिंगची यंत्रणा वर्षभरात पूर्ण करणार - पालकमंत्री शंभुराज देसाई

येथील विमानतळाचे विस्तारीकरण आणि रात्रीच्या वेळी विमान सेवा सुरू करण्यासाठीची नाईट लॅण्डींगची यंत्रणा येत्या वर्षभरात पुर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे.

हेमंत पवार

कऱ्हाड : येथील विमानतळाचे विस्तारीकरण आणि रात्रीच्या वेळी विमान सेवा सुरू करण्यासाठीची नाईट लॅण्डींगची यंत्रणा येत्या वर्षभरात पुर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. ज्यांनी भरपाईची रक्कम घेतली नाही त्या खातेदारांना पंधरा दिवसांची नोटीस देवून भूसंपादनाची भरपाई स्विकारण्याचे आवाहन करावे.

भरपाईची रक्कम न स्विकारल्यास रकमेचा भरणा कोर्टात करण्यात येवून जमीन ताब्यात घेण्यात येईल व संपादित जमिनीस लवकरात लवकर शासनाचे नाव लावण्याच्या कामास प्राधान्य देण्याचा निर्णय पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन, उद्योग वाढीला चालना मिळेल असेही ते म्हणाले.

येथील विमानतळ विस्तारीकरणाबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री देसाई बोलत होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपवनसरंक्षक आदिती भारव्दाज,

अतिरीक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, विमानतळ प्राधिकरणाचे विभागीय व्यवस्थापक संतोष नलावडे, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे आदी उपस्थित होते. कऱ्हाडचे विमानतळ विस्तारीकरण व नाईट लॅडींग हा विषय अनेक वर्षापासूनचा प्रलंबित आहे.

2012-13 मध्ये विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्याची असणारी एक हजार 280 मीटरची धावपट्टी वाढवून ती एक हजार 700 मीटर करण्यात येणार आहे. विस्तारीकरणासाठी 48 हेक्टरचे भूसंपादन झाले आहे. जवळपास 62 टक्के खातेदारांना भूसंपादन पोटी मिळणारा निधी शासनाने वितरीत केला आहे.

उर्वरित खातेदारांना पंधरा दिवसांची नोटीस देवून भूसंपादनाची भरपाई स्विकारण्याचे आवाहन करावे, अशा सुचना पालकमंत्री देसाई यांनी दिल्या. भरपाईची रक्कम न स्विकारल्यास रकमेचा भरणा कोर्टात करण्यात येवून जमीन ताब्यात घेण्यात येईल व संपादित जमिनीस लवकरात लवकर शासनाचे नाव लावण्याच्या कामास प्राधान्य देण्याचा निर्णय पालकमंत्री देसाई यांच्या बैठकीत घेण्यात आला.

उंच इमारती, टॉवरसंदर्भातही कारवाई

एअरपोर्ट ॲथोरिटी ऑफ इंडिया यांनी निर्धारित केलेल्या नियमानुसार जी बांधकामे, टॉवर्स अडथळा निर्माण करणारी ठरतील ती अतिक्रमणे काढण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देशही या बैठकीत पालकमंत्री देसाई यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT