सातारा

जिल्हाधिका-यांचा आदेश आला अन् 23 दुकानदारांचा परवाना रद्द झाला

सचिन शिंदे

कऱ्हाड : कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्स न पाळण्याच्या शासकीय पातळीवर सूचना देऊनही त्या न पाळणाऱ्या शहरातील 23 दुकानदारांचा थेट परवाना सात दिवसांसाठी रद्दची कारवाई पालिकेने केली. त्या प्रत्येक दुकानदारांकडून प्रत्येकी तीन हजार रुपयेप्रमाणे 69 हजारांचा दंडही वसूल केला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दुकानदारांसाठी नवीन आदेश दिले आहेत.

राज्य शासनाचा निर्णय : ग्रामपंचायच कर्मचाऱ्यांना वेतनवाढ

त्यानुसार नगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका कार्यक्षेत्रात (शहरी भाग) कोणत्याही प्रकारच्या दुकानांत ग्राहकांनी एकमेकांमध्ये सहा फुटांपेक्षा जास्त अंतर न ठेवल्याचे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता गर्दी केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून हे दुकान सात दिवसांपर्यंत सक्तीने बंद करण्यात येते. 

अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे गेल्या 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या : पृथ्वीराज चव्हाण

याबराेबरच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात (ग्रामीण भागात) दोन हजार रुपये दंडात्मक रक्कम आकारण्यात येऊन दुकान सात दिवसांपर्यंत बंद केले जाते. स्थानिक अधिकाऱ्यांना दंडात्मक कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.

राेटरीच्या दातृत्वाला सलाम...काेविड रुग्णांसाठी 11 ऑक्‍सिजन मशिन

या आदेशानूसार मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या नेतृत्वाखाली कऱ्हाड येथे कारवाई झाली. पोलिस व पालिकेचे प्रत्येकी तीन अशा सहा जणांच्या तीन पथकांनी शहरातील दुकानदारांवर कारवाई केली.

संपादन : सिद्धार्थ लाटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT