Karad Municipality esakal
सातारा

अर्थसंकल्प फुगविण्याचा जनशक्तीकडून उद्योग; भाजपचे टीकास्त्र

कऱ्हाड पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास नसल्यानेच कोटींची उड्डाणे

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : पालिकेच्या (Karad Municipality) आर्थिक स्थितीचा काहीही अभ्यास नसताना केवळ कोट्यवधींच्या आकडेवारीची हुल टाकून अर्थसंकल्प फुगविण्याचा उद्योग जनशक्ती आघाडीने केला आहे. वास्तवातील अर्थसंकल्पाला फाटा देऊन केवळ निवडणुकीच्या तोंडावर आम्ही काही तरी करतोय, तेच दाखविण्यासाठीच्या इगोमुळेच अर्थसंकल्प (Karad Municipal Budget) सात महिने मंजुरीविना पडून राहिला होता, त्यालाही जनशक्ती आघाडीच (Janshakti Aghadi) जबाबदार आहे, असा थेट आरोप पालिकेतील भाजपचे गटनेते विनायक पावसकर (BJP leader Vinayak Pawaskar) यांनी केला.

काहीही अभ्यास नसताना केवळ कोट्यवधींच्या आकडेवारीची हुल टाकून अर्थसंकल्प फुगविण्याचा उद्योग जनशक्ती आघाडीने केला आहे.

या वेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक फारुख पटवेकर, सौ. अंजली कुंभार उपस्थित होते. श्री. पावसकर म्हणाले, ‘‘अर्थसंकल्प मंजुरीचा अधिकार स्थायी समितीचा आहे. पालिकेच्या चार स्थायी बैठकीत १३४ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर झाला. स्थायीत जनशक्तीचे बहुमत आहे. त्यामुळे त्यांनीच मंजूर केलेला अर्थसंकल्पाला त्यांनी विशेष सभेत विरोध केला. त्यांनी पुन्हा २७० कोटींची उपसूचना मांडली. १३४ कोटींचे बजेट वास्तवपूर्ण असताना २७० कोटींच्या अर्थसंकल्पाची उपसूचना त्यांनी मांडली.

भाजपच्या नगरसेवकाने अर्थसंकल्प सादर केल्यानेच त्यांचा इगो झाला आहे. त्या वेळी जनशक्तीने ती सूचना मागितली असती तरी आम्ही हरकत घेतली नसती. सूचना मांडल्यानंतर आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी सूचना मान्य नाही, असे सांगत बेकायदेशीरपणे उपसूचना मांडली. मात्र, ती लेखी स्वरूपात दिली नव्हती. हा वाद जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर अर्थसंकल्पामध्ये सुधारणा करण्याचे ठरले. मात्र, जनशक्तीच्या सदस्यांनी कर्मचाऱ्यांना बोलावून दम दिला. त्यामुळे अर्थसंकल्प मंजुरीस उशीर झाला.

मूळ सूचना फेटाळता येत नाही : पटवेकर

अर्थसंकल्पाची मूळ सूचना फेटाळता येत नाही, असा कायदाच आहे. त्यामुळेच मूळ सूचनेसह अर्थसंकल्प मंजूर झाला आहे, असे माजी उपाध्यक्ष फारुख पटवेकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘अर्थसंकल्प प्रशासकीय पातळीवर तयार होतो. त्याला स्थायीत मंजुरी मिळते. मग तो मुख्याधिकाऱ्यांकडून विशेष सभेतच मांडला जातो. त्याची मूळ सूचना कधीच फेटाळता येत नाही. येथे ती फेटाळली तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी ती सूचना तशीच ठेवत उपसूचनेतील बदल स्वीकारून अर्थसंकल्प मंजूर केला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT