सातारा

करुन दाखवलं : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कऱ्हाड पालिका देशात अव्वल, सलग दुसऱ्या वर्षी यश

सचिन शिंदे

कऱ्हाड : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कऱ्हाड नगरपालिकेने दुसऱ्यांदा बाजी मारत यंदाही देशात पहिला क्रमांक पटकावला. एक लाख लोकसंख्येच्या पालिका गटात कऱ्हाड शहर अव्वल ठरले. गुरुवारी (ता. 20) पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे त्याची अधिकृत घोषणा होईल. कोरोनामुळे व्हर्च्युअल ऑनलाइन पुरस्कार वितरण होणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह ठराविकांना मुंबईत येण्याचे निमंत्रण राज्य नागरी विकास अभियान संचालनालयातर्फे नुकतेच मिळाले. त्यामुळे कऱ्हाड पालिकेच्या यशावर शिक्कामोर्तब झाले.

जावळीतील पांडवकालीन मरडेश्वर शिवलिंग
 
मागील वर्षी याच स्पर्धेत कऱ्हाड पालिकेने एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला होता. यंदाही स्पर्धेत कऱ्हाड देशात अव्वल क्रमांकावर ठरेल, अशी आशा आहे. याबाबत जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव म्हणाले, ""मागील वर्षी सुमारे चार हजार शहरांमध्ये कऱ्हाडचा प्रथम क्रमांक आला होता. यंदाही पालिका स्पर्धेत अव्वल राहील. केंद्रीय नगरविकास व शहरी आवास मंत्रालयाकडून पालिकेस याबाबतचे पत्र मिळाले आहे. त्यामुळे पालिकेचा क्रमांक निश्‍चित आहे. पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात 2018 व 2019 या दोन्ही वर्षांत चांगली कामगिरी केली होती. यावर्षीही चांगली कामगिरी केली आहे. नागरिकांनी पालिकेच्या स्वच्छता विषयक उपक्रमांना भरघोस पाठिंबा दिला. त्यामुळे पालिका स्वच्छ सर्वेक्षणात अग्रेसर राहिली आहे. पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे परिश्रम त्यामागे आहेत.

शरद पवारांची ब्रीच कँडीमध्ये झाली कोरोना टेस्ट, रिपोर्टबद्दल राजेश टोपे म्हणालेत...

राष्ट्रवादी कॉंग्रेस इन ऍक्‍शन, रेमडिसिव्हर इंजेक्‍शन चोरीचे कोणास इंफेक्‍शन?

नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका व गट नेते, स्वच्छता दूत, 105 सामाजिक संस्था, त्यांचे प्रतिनिधी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकांचेही सहकार्य लाभले आहे. या यशात तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगेंचा सिंहाचा वाटा आहे. शहरात कचरा संकलन, विलगीकरण व त्यावर प्रक्रिया करण्यात नगरपालिका 100 टक्के यशस्वी झाली आहे. त्यामुळे पालिकेस कचरामुक्त शहराचे थ्री स्टार मानांकन आहे. कृष्णा नदीचे सौंदर्यीकरण, भूमिगत गटारे, सांडपाण्यावर प्रक्रिया, शेतीसाठी त्याचा पुनर्वापर, सार्वजनिक शौचालये, ओल्या कचऱ्यावरील प्रक्रिया, बारा डबरे येथे स्वच्छता उद्यान अशा विविध पातळ्यांवर पालिकेने यश मिळवले आहे.'' 


यंदाच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक कायम राखणे आव्हानात्मक होते. त्यात यश आल्याने पालिकेचा अव्वल क्रमांक निश्‍चित आहे. दोन वर्षे स्वच्छ सर्वेक्षणचा पुरस्कार मिळणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. 

- राजेंद्र यादव, गटनेते, जनशक्ती आघाडी, कऱ्हाड.


Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT