Chandrakant Patil esakal
सातारा

आगामी निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतः लक्ष घालणार

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाड पालिकेच्या (Karad Municipality) राजकारणात ऐतिहासिक बदल घडवत भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janata Party) २०१६ मध्ये नगराध्यक्षपदाची बाजी मारली. ही राजकीय खेळी नसून भाजपने ताकद लावून खेचून आणलेला होता, हे सिद्ध करण्यासाठी २०२१ मध्ये कऱ्हाड पालिकेच्या निवडणुकीत बहुमतासाठी भाजपच्या स्थानिकांनी एकत्र या, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP leader Chandrakant Patil) यांनी दिला आहे. त्यामुळे सारी भाजप झाडून कामाला लागेलही. मात्र, कऱ्हाड भाजपमधील मतभेदांवर प्रदेशाध्यक्षांचा उतारा नक्की कितीपत कामी येणार, ते येणाऱ्या काळातील राजकीय घडामोडीच सिद्ध करतील.

कऱ्हाड पालिकेच्या राजकारणात ऐतिहासिक बदल घडवत भारतीय जनता पक्षाने २०१६ मध्ये नगराध्यक्षपदाची बाजी मारली.

भाजप पक्षांतर्गत झालेल्या महत्त्‍वाच्या बैठकीत भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व नेते शेखर चरेगावकर अशा तिन्ही नेत्यांना गटातील मतभेदांसह मनभेदही बाजूला ठेवून पालिकेत सत्ता आणा, गटबाजी थांबवून पक्ष वाढवा, असा सल्ला प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिला आहे. आगामी निवडणुकीत कऱ्हाड पालिका ताब्यात घेण्यासाठी एकत्रित येऊन आणखी काम करण्याचे व त्यात मी स्वतः लक्ष घालणार असल्याचेही संकेत प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी काळातील पालिकेची निवडणूक भाजपसाठी महत्त्‍वाची आहे. त्यासाठीची फिल्‍डिंग आत्तापासून लावली जाणार आहे. पक्षपातळीवरील बैठकीत तसे संकेत मिळाले आहेत, आता नेत्यांच्या पातळीवर एकत्रिकरणाकडे लक्ष लागले आहे. पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची मॅरेथॉन बैठक झाली. त्याला पक्षांतर्गत मोठे महत्त्‍व प्राप्त झाले आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पहिल्यांदाच कऱ्हाडच्या भाजमधील सुंदोपसुंदीवर भाष्य केले आहे, त्याची भाजपच्या पदाधिकाऱ्यांत जोरदार चर्चा आहे.

कऱ्हाडला भाजपची सत्ता येईल का, सत्ता आली तर नगराध्यक्ष पुन्हा भाजपचाच होईल का, कोणाशी आघाडी करावी लागेल, आघाडी न करता भाजपची काय स्थिती होईल, अशा प्रश्नांची उकल प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी कऱ्हाडच्या तिन्ही नेत्यांसमोर केली. त्यामुळे भाजपच्या पक्षांतर्गत गटाचा अंदाज प्रदेशाध्यक्ष पाटील यांना आला. २०१६ मध्ये भाजपने नगराध्यक्षपदावर विजय मिळवल्याची चांगली गोष्ट आहे. मात्र, काही विशिष्‍ट राजकीय खेळीमुळे ते पद भाजपला मिळाल्याची चर्चा घडवली जात आहे. ती हाणून पाडण्यासाठी पालिकेच्या आगामी निवडणुकीत एकत्रित एका विचाराने सामोरे जाण्यासाठी भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी एकत्र यावे, कऱ्हाडच्या भाजपमध्ये गटनिहाय व नेतानिहाय शकले आहेत, याची कल्पना आहे. ते सारे विसरून भाजप एक पक्ष म्हणून तुम्ही सगळ्याच नेत्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे सुचविण्यात आले आहे. त्यामुळे त्याची उत्सुकता ताणली आहे.

प्रदेशाध्यक्षांचा कानमंत्र

शक्ती केंद्र, बुथनिहाय कार्यकर्त्यांची बांधणी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केल्यास पक्षाला यश मिळू शकते, असा कानमंत्र प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिला आहे. त्यासाठी सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, अशी टिप्पणी करताना त्यांनी कार्यकर्ता महत्त्‍वाचा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता आगामी स्थिती भाजपसाठी परीक्षेचीच ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT