- सचिन शिंदे
कऱ्हाड - सध्या शहराला जुन्या जॅकवेलमधून होणारा पाणीपुरवठा डिझेल जनरेटरवरून सुरू आहे. तेथे नवीन विजेची केबल बसवली आहे. त्यामुळे जनरेटवरील काम थांबणार आहे. त्यासोबतच जॅकवेलच्या जुन्या कोयना पुलावरून पर्यायी पाईप जोडणीचे काम पू्रमत्वाकडे आहे.
त्याची प्राथमिक चाचणी दोन दिवसात होईल. त्यांतर त्यातून कमी क्षमतेने पाणीपुरवठा होवू शकतो., अशी माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज मोरे, अल्पसंख्यांक विभागाचे पश्चीम महाराष्ट्राचे अध्यक्ष झाकीर पठाण उपस्थित होते.
आमदार चव्हाण यांनी वारूंजी जॅकवेलमधून पाणीपुरवठा होण्यासाठी पर्यायी नवीन कोयना पुलावरून पाईपलाईन टाकण्याच्या कामाची पहाणी केली. येथील नवीन कोयना पुलावर भेट दिली. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला.
आमदार चव्हाण म्हणाले, शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्याला प्राधान्य ठेवा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, नविन पाईपलाईनचे काम काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्याची प्राथमिक चाचणी होईल.
त्यानंतर दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत माहिती दिली आहे. चाचणी यशस्वी झाल्यास पर्यायी पाईपलाईन मधून शहराला पाणीपुरवठा सुरळीत होईल. शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागल्यानंतर पालिकेने तातडीने जुना जॅकवेल कार्यान्वित केला होता, त्याची वीज वाहिनी तुटल्याने ती नवीन टाकण्याचे काम सुरू आहे तीही कार्यान्वित झाल्यानंतर शहराचा डिझेल जनरेटरवरून होणारा पाणीपुरवठा बंद होईल.
जुन्या जॅकवेलच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणार आहे. नवीन कोयना पुलावरून पाईपलाईन टाकण्याचे काम अंतिम टप्यात सुरू आहे. काम दोन दिवसात पूर्ण होईल. पाईपलाईनला काही ठिकाणी वळणे आहेत त्यामुळे पाणी क्षमता किती राहणार याबाबत शंका आहे तरीसुद्धा गोष्टीला सद्यस्थितीत पर्याय नाही. काम पूर्ण झाल्यानंतर पाईपलाईनची चाचणी घेण्यात येईल. ती यशस्वी झाल्यानंतर शहराला नियमित पाणी पुरवठा सुरू होईल.
आमदार चव्हाण म्हणाले, शहराला दरररोज ३० एमएलडी पाण्याची गरज आहे. जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी २२ ते २३ एमएलडी पर्यंत पाणी पुरवठा होईल, असे सांगितले आहे. प्रत्यक्षात पाहणी केली असता हे शक्य होईल का याची शंका आहे. कारण जल वाहिनीला वळण असत नाही. पाईपला १२० अंशाचे वळण टाकावे लागले आहे. तरीपण १८ ते २० एमएलडी पर्यंतचा पाणी पुरवठा होईल. पर्यायी व्यवस्था काही दिवसांसाठी असेल.
कायमस्वरूपी पर्याय म्हणून नवीन कोयना पुलावरून ६०० मिलिमीटर व्यासाच्या दोन पाईप लाईन टाकाव्या लागणार आहेत. पुलाची दाब सहन करण्याची क्षमता आहे का, त्याची तपासणी त्या बाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली आहे. महामार्गाच्या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलणे झाले आहे. काम समाधानकारक सुरू आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर पाणी पुरवठा किती क्षमतेने होईल, हे स्पष्ट होईल.
नदीच्या पात्रातून वाहिन्या नेण्याऐवजी जुन्या कृष्णा पूलावरून 600 मिलीमिटर व्यासाच्या ऐवजी 450 मिलिमिटर व्यासाची एक लोखंडी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. पाईप वर नेण्यासाठी व वरून खाली आणण्यासाठी अनेक बेंड आहेत. पाण्याची गती पाणी क्षमता कमी होण्याची शक्यता आहे.
कराड शहराची गरज 30 एमएलडीची आहे. मात्र 18 ते 20 एमएलडी पाणीपुरवठा होईल. जादा पाणी मिळण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. कोयना नदीवर पुलामध्ये दोन नलिका टाकण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. पुलाची क्षमता तेवढी आहे का हे तपासावे लागणार आहे.
सध्या कमी व्यासाच्या दोन नलिका टाकून पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यानंतर कायमस्वरूपी मोठ्या पाईपा बसवून पूर्वीइतके पाणी शहराला जाणार आहे. काम समाधानकारक चालले आहे. उद्या किंवा परवा चाचणी होवून पाणी पुरवठा होणार आहे. असेही आ. चव्हाण यांनी संगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.