Karad Crime esakal
सातारा

कोल्हापूर, सातारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील दरोडेखोरांची टोळी कऱ्हाडात पकडली; तीन पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त

सकाळ डिजिटल टीम

पोलिसांनी अटक केलेल्या पाचही संशयितांची कळंबा कारगृहात घट्ट मैत्री झाल्याचे पोलिसांकडून समजते. पाचही जण वेगवेगळ्या भागातील आहेत.

कऱ्हाड : कोल्हापूर, सातारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयितांच्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी शिताफीने पकडले. त्यांच्याकडून तीन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, धारदार सुरा, दोन कोयते व दुचाकी असा सुमारे तीन लाख ३७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

कऱ्हाडच्या विद्यानगर भागात शहर पोलिसांच्या डीबी पथकाने (DB Squad) पाठलाग करून ही कारवाई केली. यावेळी झालेल्या झटापटीत पळालेल्या दोघा संशयितांना साताऱ्याच्या एलसीबी पथकाने (LCB Squad) जेरबंद केले. पकडलेले संशयित दरोड्याच्या तयारीत होते, अशी कबुली टोळीतील संशयितांनी दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख (Superintendent of Police Sameer Sheikh) यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

बबलू ऊर्फ विजय संजय जावीर (रा. शहापूर-इचलकरंजी), अनिकेत वसंत पाटणकर (रा. गोडोली, सातारा), सूरज नानासाहेब बुधावले (रा. विसापूर- पुसेगाव), राहुल अरुण मेनन (मूळ रा. केरळ सध्या राहणार विद्यानगर) व आकाश आनंदा मंडले (रा. खटाव) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी छापा टाकला त्या वेळी त्यांच्याकडून तीन देशी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, धारदार सुरा, दोन कोयते व अन्य साहित्य असा एकूण तीन लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अटकेतील सर्वच संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

बबलूवर खून, दरोडा, जबरी चोरी, सरकारी नोकरावर हल्ला असे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. पाटणकरवर खून, दरोडा, जबरी चोरी, मारहाण असे नऊ गंभीर गुन्हे, बुधावलेवर खून, शस्त्र बाळगण्यासहित गंभीर गुन्हे, मेमनवर खून, घरफोडी, दरोडा, जबरी चोरीसारखे चार गुन्हे दाखल आहेत. अटकेतील संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयित आहेत. त्यांची टोळीही त्यांनी तयार केली आहे. त्या माध्यमातून त्यांनी गुन्हे केल्याची माहिती पुढे येत आहे. त्याचाही उलगडा दोन दिवसांत होण्याची शक्यता पोलिस अधीक्षक श्री. शेख यांनी वर्तवली. पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी कारवाईचे आदेश दिले होते.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील व पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली कारवाई झाली. त्यात डीबी पथकाला विद्यानगर भागात जयराम कॉलनी येथे काही लोक सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती मिळाली. विद्यानगरमध्ये ते लोक दोन महिन्यांपासून वास्तव्यात होते. काल सकाळी डीबीचे पोलिस तेथे पाहणी करण्यास गेले. त्या वेळी पोलिसांना पाहून त्यांची धावपळ उडाली. पोलिस आणि रेकॉर्डवरील गुंड यांच्यात झटापटही झाली. त्या वेळी पाचपैकी तिघे जण पोलिसांच्या हाती लागले. दोघे जण पळून गेले. त्यांना एलसीबीच्या पथकाने दुपारी ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पाटील, पोलिस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.

त्यात सहायक पोलिस निरीक्षक रोहित फार्णे, फौजदार पतंग पाटील, सहायक फौजदार गोवारकर, संजय देवकुळे, शशिकांत काळे, अमित पवार, प्रवीण काटवटे, सचिन सूर्यवंशी, पोलिस नाईक कुलदीप कोळी, संतोष पाडळे, अनिल स्वामी, महेश शिंदे, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील, धीरज कोरडे, सोनाली पिसाळ, संदीप शेडगे, साताऱ्याचे शरद बेबले, प्रवीण फडतरे, लेलेश फडतरे, साबीर मुल्ला, अविनाश चव्हाण, रोहित निकम, मयूर देशमुख, मोसीन मोमीन यांनी सहभाग घेतला. विद्यानगर भागात कारवाई करण्यासाठी कऱ्हाडच्या डीबीचे पथक पोहचले. पोलिसांना पाहताच त्यांनी तेथून पळ काढला. अत्यंत जिकिरीच्या स्थितीत तिघांना जेरबंद केले.

कारागृहात झाली भेट

पोलिसांनी अटक केलेल्या पाचही संशयितांची कळंबा कारगृहात घट्ट मैत्री झाल्याचे पोलिसांकडून समजते. पाचही जण वेगवेगळ्या भागातील आहेत. त्यांचे गुन्हेही वेगवेगळे असले, तरी खून, खुनी हल्ला, मारामारी या गुन्ह्यांत साधर्म्य असल्याने त्यांचे ट्युनिंग जुळले. त्यातून त्यांनी टोळी तयार केली. टोळी तयार करण्यात कऱ्हाडला वास्तव्यास असलेल्या राहुल मेननचा पुढाकार आहे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'मातोश्री'वरुन दिलेले एबी फॉर्म उमेदवारांनी नाकारले? आदित्य ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

Diwali 2024: दिवाळीत भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास होऊ शकतो कॅन्सर, FSSAI ने सांगितले नकली खवा कसा ओळखाल

Sunny Deol : पर्वतांमध्ये रमला सनी देओल, पण चर्चा कॅप्शनचीच; नेटकरी कमेंट करत म्हणाले-

IND vs NZ, 1st Test: भारताला रचिन-साऊदी पडले भारी! न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची विक्रमी आघाडी

SCROLL FOR NEXT