Ratnagiri Crime News esakal
सातारा

Karad Police : मध्य प्रदेशातून पळून आलेल्या अल्पवयीन प्रेमीयुगुलास कऱ्हाड पोलिसांनी घेतलं ताब्यात; काय आहे प्रकरण?

ताब्यात घेताच दोघानीही पळून आल्याचे केले कबूल

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

पोलिसांनी उज्जैन पोलिसांकडे चौकशी केली असता, तेथे त्या दोघांबद्दलचा गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले.

कऱ्हाड : रात्रगस्त घालणाऱ्या निर्भया पथकाने (Nirbhaya Squad) मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) पळून आलेल्या अवल्पवयीन मुलीसह मुलास ताब्यात घेतले. त्यांना आज उज्जैन पोलिसांच्या (Ujjain Police) ताब्यात देण्यात आले आहे.

मुलीस पळवून नेल्याबद्दलचा गुन्हा दाखल असल्याने त्यांना ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, परवा रात्री निर्भया पथकाच्या दीपा पाटील, प्रीतमा कांबळे, स्वप्निल साबळे व अमोल फल्ले यांचे पथक रात्रगस्त घालत होते. त्यावेळी बसस्थानाका बाहेर त्यांना मुलगा व मुलगी वाद घालताना दिसली.

पथकाने चौकशीसाठी बोलवले असता, त्यातील मुलगी बसस्थानकात पळून गेली. त्या पाठोपाठ तो मुलगाही पळाला. पोलिसांनी तेथे जावून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, ते मध्य प्रदेशातील असल्याचे त्यांनी सांगितले.

दोघानीही पळून आल्याचे कबूल केले. दोघेही अल्पवयीन असून ते पळून आल्याचे पोलिसांचीही खात्री झाली. पोलिसांनी उज्जैन पोलिसांकडे चौकशी केली असता तेथे त्या दोघांबद्दलचा गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले. या दोघांना येथे ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर उज्जैन पोलिसांनी येथे येवून त्या दोघांना ताब्यात घेतले. निर्भया पथकाने केलेल्या कामगिरीचे पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

Latest Maharashtra News Updates : 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीस

Sanjay Raut : भाजप एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीच काय विरोधी पक्ष नेता पण करणार नाही , संजय राऊत यांचा खोचक टोला

SCROLL FOR NEXT