कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिणमध्ये तुमचा सेवक म्हणून काम करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे, असे आश्वासन महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिले.
महायुतीच्या काले येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे, शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील, कारखाना उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील, दत्तात्रय देसाई, गणपतराव हुलवान, सुलोचना पवार, सुहास जगताप, दादा शिंगण, शिवाजीराव थोरात, आत्माराव तांदळे, ॲड. दीपक थोरात, माथाडी ट्रान्स्पोर्ट सुरक्षा रक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय निकम उपस्थित होते.
माता-भगिनींच्या कल्याणासाठी, युवकांच्या रोजगारासाठी, जनतेच्या हक्कांसाठी आणि कऱ्हाड दक्षिणच्या शाश्वत विकासासाठी काम करण्याची मला संधी द्या, असे आवाहन करून डॉ. भोसले म्हणाले, ‘‘विद्यमान लोकप्रतिनिधी खूप मोठे नेते आहेत.
त्यांनी खरेतर अनेक ठिकाणी फिरून तिथे त्यांच्या पक्षाचे आमदार निवडून आणायला हवे होते; पण ते कुठेही गेलेले नाहीत. इतके मोठे आहेत, की राहुल गांधी त्यांचे नाव घेत नाहीत, की प्रियांका गांधी त्यांच्या सभेला येत नाहीत. गेले २०-२५ दिवस तुम्ही कऱ्हाड दक्षिणसाठी काय भरीव योगदान दिले याबद्दल विचारतोय; पण त्याबद्दल ते एकही ठोस उत्तर देऊ शकलेले नाहीत.
’’ डॉ. भोसले म्हणाले, ‘‘गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील गावांमध्ये गेलेले नाहीत. कार्यकर्ते व मतदारांनाही ओळखत नाहीत. याउलट अडीच वर्षांत महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात मोठा विकासनिधी आणता आला, याचे मला समाधान आहे.’’
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘‘दहा वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने महिला, शेतकरी, विद्यार्थी यांच्यासाठी असंख्य योजना आणल्या. गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारनेदेखील जनकल्याणाच्या अनेक योजना साकारल्या; ज्याचा लाभ कऱ्हाड दक्षिणमधील लोकांना मोठ्या प्रमाणावर मिळवून देण्यासाठी डॉ. अतुलबाबा भोसले प्रयत्नशील राहिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत डॉ. अतुलबाबांना विजयी करावे.’’
प्रा. सकटे म्हणाले, ‘‘२० वर्षांपासून तरुणांना संधी द्यायला पाहिजे, असे म्हणणाऱ्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी तरुणाला संधी द्यायचे सोडून स्वत:च उमेदवारीचे तिकीट घेतले आहे. ’’
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.