St Ticket Machine sakal
सातारा

St Ticket Machine : एसटी महामंडळाच्या तिकीट मशिन बनल्या डोकेदुखी

एसटी महामंडळाने वाहकांना इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिन दिली आहेत. त्यांतील निम्म्याहून अधिक मशिन सदोष असल्याने वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

हेमंत पवार

कऱ्हाड - एसटी महामंडळाने वाहकांना इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिन दिली आहेत. त्यांतील निम्म्याहून अधिक मशिन सदोष असल्याने वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट देण्याच्या वेळेसच मशिन हँग होत असल्याने तिकीट देण्यासाठी विलंब लागत आहे. काही वेळा मशिन बंद करून पुन्हा सुरू करण्याशिवाय पर्याय नसतो. अशा वेळी बसमध्ये वाहकांची ‘सर्कस’ होताना दिसते.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाने काळानुरूप बदलासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांना एसटीने प्रवास करताना अडचणी येऊ नये, यासाठी आता सवलतीच्या पाससाठी स्मार्टकार्ड सुरू केली आहे. त्याचबरोबर आता डिजिटल सेवेकडेही महामंडळ वळत आहे. यापुढे एटीएमवरून तिकीट काढण्याची सुविधा सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. महामंडळ १८ हजार गाड्यांतून रोज ४० लाख प्रवाशांची प्रवास वाहतूक करते. त्यातून राज्यातून सुमारे १० कोटींचा महसूल मिळतो. त्यामुळे प्रवाशांना चांगली सेवा देण्याची जबाबदारी महामंडळाची आहे. इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिनचा ठेका एक कंपनीला दिला आहे. त्यांनी राज्यभरात ६० ते ७० हजार मशिन दिली आहेत.

यामध्ये विशिष्‍ट सॉफ्टवेअर बसवले आहे. यातून कागदी तिकिटे बाहेर येतात. किती प्रवाशांना तिकिटे दिली, एकूण किती पैसे जमा झाले, तारीख, वार, वेळ या नोंदणीसह सर्व हिशेब एसटी महामंडळाकडे जमा होतो. प्रवाशांना झटपट तिकिटे मिळतात. असे हे मशिन वाहकांसाठी वरदान ठरले. मात्र, कालांतराने मशिन बंद पडणे, बटणे खराब होणे, छापील रक्कम पुसट होणे, कागदी रिळ अडकणे अशा अनेक तक्रारी येऊ लागल्या. अशा तक्रारी गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. एसटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट देण्याच्या वेळी नेमके मशिन हँग होते. त्यामुळे प्रवाशांना तिकीट देण्यासाठी विलंब लागत आहे.

अनेकदा मशिन बंद करून पुन्हा सुरू करण्याशिवाय पर्याय राहात नाही. अशा वेळी बसमध्ये वाहकाची ‘सर्कस होते. गेल्या वर्षभरापासून ही समस्या आहे. मात्र, त्याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे चित्र आहे. मशिन ‘हँग’ होत असल्याने नव्या मशिन मागविण्याची मागणी केल्या जात आहेत. मात्र, त्या मिळत नसल्याने वाहक त्रस्त आहेत.

एक- दोन तासांतच मशिन पडते बंद

मध्यंतरी मशिनच्या बॅटरीत समस्या निर्माण झाली होती. काही मशिन पूर्णपणे चार्ज केल्यानंतरही ते एक-दोन तासच चालतात. ही समस्या सोडवण्यासाठी काही वाहकांनी बॅटरी बदलून मशिन चालवण्याचा प्रयत्न केला. यानंतर एसटी महामंडळानेही काही मशिनच्या बॅटऱ्या बदलल्या. मात्र, त्याचा फारसा फायदा झाला नाही. आता मशिन हँग झाल्यामुळे तिकीट अडकून पडल्याने प्रवाशांना वेळेवर तिकीट वितरित होत नाही. त्यामुळे ही समस्या कायमची सोडवावी, अशी मागणी वाहकांकडून होत आहे.

इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिनबाबत अनेकदा तक्रारी करूनही एसटी महामंडळाने दखल घेतलेली नाही. नवीन मशिन येणार आहेत, असे सांगितले जाते. मात्र, त्याही येत नसल्याने वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचा विचार एसटी महामंडळाने करावा.

- अहमद तांबोळी, सचिव, एसटी कर्मचारी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: ‘सकाळ’च्या डिजिटल पानाचा गैरवापर; एकावर गुन्हा दाखल, निवडणूक प्रचाराबाबतच्या खोडसाळपणाची पोलिसांकडून गांभीर्याने दखल

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश! इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या १३४ कर्मचाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे; ‘या’ ८ मतदारसंघातील आहेत कर्मचारी

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

SCROLL FOR NEXT