सातारा

कऱ्हाड : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येथे भरा अर्ज

हेमंत पवार

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्‍यातील 104 ग्रामपंचायतींसाठी आजपासून (ता. 23) अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. त्यासाठी येथील तहसील कार्यालयाच्या वतीने प्रशासकीय इमारत आणि पंचायत समितीतील चार ठिकाणी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी अमरदीप वाकडे यांनी ही माहिती दिली.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अन्य बातम्या वाचा
 
कोरोनाच्या लॉकडाउन शिथिलतेनंतर तालुक्‍यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या ठिकाणांची आज घोषणा करण्यात आली आली. त्यानुसार येथील पंचायत समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हजारमाची, कामथी, किरपे, येणके, विंग, शिंदेवाडी-विंग, कार्वे व मुंढे. रेव्हेन्यू क्‍लबमध्ये ओंड, जिंती, शेरे, शेणोली, मालखेड, घोणशी, घारेवाडी, खुबी, संजयनगर. नवीन प्रशासकीय इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर गायकवाडवाडी, शहापूर, वाघेश्वर, म्हासोली, लटकेवाडी, कालवडे, गमेवाडी, साकुर्डी, बेलदरे, जखिणवाडी, भोळेवाडी, म्होप्रे, धोंडेवाडी, नांदगाव, पोतले, साळशिरंबे, महारुगडेवाडी, शेवाळवाडी (म्हासोली), शेळकेवाडी (म्हासोली), सवादे, शेवाळवाडी (उंडाळे), केसे, पाडळी-केसे, घोगाव, टाळगाव, गोटेवाडी, भुरभुशी.

माझ्या आईने मनोधैर्य वाढवल्यामुळेच करू शकलो नरभक्षक बिबट्याची शिकार ! धवलसिंह मोहिते-पाटलांच्या डोळ्यांतून तरळले अश्रू
 

नवीन प्रशासकीय इमारतीच्या तळघरात कोणेगाव, रिसवड, शिवडे, भवानवाडी, वस्ती साकुर्डी, अंबवडे, उंब्रज, खालकरवाडी, इंदोली, हरपळवाडी, मरळी, वडगाव-उंब्रज, तासवडे, वराडे, शिरवडे, वडोली निळेश्वर, शिरगाव, चोरे, वहागाव, खोडशी, तांबवे, आबईचीवाडी, खराडे, नवीन कवठे, पाल, साजूर, गोळेश्वर, वारुंजी, चिखली, खोडजाईवाडी, कोपर्डे हवेली, वाठार, बेलवडे बुद्रुक, कोळे, बामनवाडी, सैदापूर, पाचुंद, येरवळे, चचेगाव, गोटे, वसंतगड, नांदलापूर, भरेवाडी, काले, चौगुलेमळा, उंडाळे, अकाईचीवाडी, पार्ले, निगडी, हणबरवाडी, बनवडी, पेरले, भुयाचीवाडी, विरवडे, करवडी, वाघेरी, कोडोली, गोवारे, सुर्ली, बेलवडे हवेली ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, असे तहसीलदार वाकडे यांनी नमूद केले.

ग्रामपंचायत निवडणुक लढविणार आहात! वेगवेगळ्या प्रभागातून अर्ज भरु नका

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT