arrears sakal
सातारा

कऱ्हाडला थकबाकीदार झळकणार फ्लेक्सवर!

नागरिकांची १४ कोटी, शासकीय कार्यालयांच्या सव्वाकोटीच्या वसुलीसाठी पथकांची स्थापना

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : शासकीय कार्यालयांसह शहरातील करवसुलीवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील थकबाकीदारांची नावे फ्लेक्सवर (flex)लिहून ते फ्लेक्स सार्वजनिक ठिकाणी लावले जाणार आहेत. शासकीय कर वसुलीलाही पालिकेने स्वतंत्र व्यवस्था केली आहे. आतापर्यंत पाच कोटींची वसुली पालिकेने केली आहे. अद्यापही १४ कोटींची थकबाकी वसूल होणे बाकी आहे. त्यात शासकीय कार्यालयांची सव्वाकोटीच्या आसपास वसुली बाकी आहे. त्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. शहराचे चार वेगवेगळे भाग करून पाच पथकांकडे वसुलीची जबाबदारी दिली आहे.

शहरातील प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस उपअधीक्षक, पंचायत समिती उपजिल्हा रुग्णालयासह शहरातील तब्बल १२ हून अधिक विविध शासकीय कार्यालयांकडे पाच वर्षांपासून पालिकेची तब्बल सव्वाकोटीची कराची थकबाकी आहे. त्यासोबत शहरातील नागरिकांकडूनही पाणीपट्टी व घरपट्टीची थकबाकी शिल्लक आहे. पालिकेला कोरोनामुळे कोणतेही उत्पन्नाची स्रोत नसल्याने पालिकेने करवसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी पाणी व घरपट्टीच्या वसुलीसाठी मोठे निर्णय मुख्याधिकारी रमाकांत डाके घेत आहेत. शहरातील मोठ्या थकबाकीदारांची नावे फ्लेक्सवर लिहून ते फ्लेक्स सार्वजनिक ठिकाणी लावले जाणार आहेत, अशी माहिती श्री. डाके यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी पालिकेचा संकलित कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन श्री. डाके यांनी केले आहे. शहराचे चार वेगवेगळे भाग करून तेथील नागरिकांच्या थकीत कराच्या वसुलीसाठी स्वतंत्र पथके नेमली आहेत. शासकीय थकबाकीही कोटीत आहे. या वसुलीचे आव्हान आहे.(satara news)

शासकीय कार्यालयांचा थकीत कर

  • प्रांताधिकारी ११ लाख ४६ हजार १४२ दोन लाख ५० हजार ९०१

  • तहसीलदार ३२ लाख ९६ हजार ५६८ ३२ हजार ८०२

  • पंचायत समिती एक लाख ६४ हजार ८०७ ५२ हजार ४८०

  • उपजिल्हा रुग्णालय १७ लाख ९७ हजार ४३५ ९८ हजार

  • बीएसएनएल १५ लाख ८ हजार ६११ २२ हजार ७७०

  • जिल्हा परिषद बांधकाम तीन लाख ७७ हजार ८८७ ४३ हजार ०१०

  • सार्वजनिक बांधकाम ३ लाख ३ हजार १४५ सात हजार १२०

  • सातारा जिल्हा परिषद दोन लाख ८५ हजार ४३७ शून्य

  • कृष्णा कालवा उपविभाग दोन लाख ६७ हजार ०४९ शून्य

  • रेव्हेन्यू क्लब ११ लाख २९ हजार ६८३ १७ हजार २१५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

Gold Price: सोने 6,000 आणि चांदी 12,000 रुपयांनी स्वस्त; ट्रम्प यांच्या विजयानंतर सोनं स्वस्त का होत आहे?

SCROLL FOR NEXT