सातारा

Karhad Water Problem: पाणी प्रश्नाला हिंसक वळण; मशिनरींची मोडतोडीसह जाळण्याचा प्रयत्न

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाडला

सातारा

कऱ्हाड, ता. २४ ः शहरातील पाणी प्रश्नावरून आठवभर जोरदार घमासान सुरू असतानाच त्या प्रकरणाला आज वेगळेच हिंसक वळण लागले. पाणी प्रश्नावर संतप्त झालेल्या काही अनोळखी नागरकांनी नदी पात्रात पूल बनवणाऱ्या संबंधित कंपनीच्या मशीनरींची मोडतोड केली. त्या सगळ्यावर डिझेल ओतून ती जाळण्याचा प्रयत्न केला. भर दिवसा साडेअकराच्या सुमारास काही अनोळखी लोकांनी केलेल्या दडगफेकीत कंपनीच्या पोकलेन, जेसीबीसही अन्य वाहनांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न चिघण्याची भिती निर्माण झाली आहे. त्या परिसरात पोलिसांनी दिवसभर बंदोबस्त ठेवला होता. त्या परिसरातील सीसीटिव्हीवरून त्यात कोणाचा सहभाग आहे, त्याचा पोलिस शोध घेत आहेत. त्या प्रकरणाची पोलिसात नोंद झाली आहे.

नदीपात्रात संबंधीत ठेकेदार कंपनीकडून चुकीच्या पध्दतीने भरावा घातल्याचे निर्दशनास आल्याने त्याचा शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आठवड्यापेक्षाही जास्त काळापासून शहरात पाण्याची ओरड सुरू आहे. मुख्य पाईपलाईनचे नुकसान झाल्याने कृत्रीम पाणी टंचाईशी सामना करावा लागतो आहे. पालिकेने जुन्या जॅकवेलची दुरुस्ती केली आहे. त्याव्दारे शहराला तात्पुरता पाणीपुरवठा सुरू आहे. कालही रात्री कंपनीच्या क्रेनमुळे जॅकवेलच्या मोटारीला विद्युत पुरवठा करणारी वायर कट झाल्याने शॉर्टसर्किट होऊन विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याच्या भिती होती. त्याचा राग आज दगडफेकीत परावर्तीत झाल्याची चर्चा आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास काही अनोळखी संतप्त नागरिकांनी क्रेनसहीत तेथील सर्वच वाहनांवर दगडफेक करत त्या वाहनांची मोडतोड केली. क्रेनसहीत जेसीबी व अन्य वाहनांच्या टायरवर डिझेल ओतून ते पेटवण्याचा प्रयत्न झाला. मात्र पावसाच्या संततधारेमुळे वाहनांनी पेट घेतला नसल्याने पुढचा अनर्थ टळला. पुणे-बंगळुरू महामार्गावर शहरानजीक महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्या कामादरम्यान कोयना नदीवर नवा पुल उभारला जातो आहे. त्यासाठी कोयना नदीपत्रात भराव टाकून पाणीप्रवाह रोखण्यात आला होता. त्यासाठी वापरलेले चुकीच्या कार्यपद्धतीमुळे नदीला आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे तीव्र पाणीप्रवाह निर्माण होऊन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे नुकसान झाल्याने शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी, पालिका, प्रशासनासहीत संबंधीत कंपनीतर्फेही टँकरने पाणीपुरवठा केला गेला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जॅकवेच्या पंपाची दुरुस्ती करून एकवेळचा तात्पुरता पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यातच काल रात्री त्या कंपनीची भलीमोठी क्रेन अडकली. त्यामुळे शहर पुन्हा पाणी टंचाईच्या सावटाखाली गेले होते. सुदैवाने ती जाणवली नाही. मात्र जॅकवेलच्या मोटरला विद्युत पुरवठा करणाऱ्या वायर शॉर्ट झाल्यामुळे जॅकवेलच्या मोटरचा विद्युत पुरवठा खंडित झाला. त्याचा राग काही नागरीकांनी संबंधित ठेकेदार कंपनीच्या वाहनांवर काढला. वरचेवर हलगर्जीपणा होत असल्याने अखेर संतप्त झालेल्या काही अनोळखी नागरिकांनी जॅकवेलजवळील कंपनीच्या क्रेन, पोकलॅन्डवर दगडफेक केली. त्या वाहनांच्या टायरवर डिझेल ओतून ती जाळण्याचाही प्रयत्न झाला. मात्र पावसामुळे पुढचा अनर्थ टळाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण होते. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. येथे पोलिसांचा दिवसभर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केले आहे.

(चौकट)

चिखलातही पंचनामा

पाणी प्रश्नावरून वाहने जाळण्याचा प्रयत्न झाल्याची व त्यांची मोडतोड झाल्याचे समजताच काही वेळेत पोलिस तेथे दाखल झाले. त्यांनी चिखलात जावून त्या वाहनांचा पंचनामा केला. पोलिसनिरिक्षक के. एन. पाटील, फौजदार पतंग पाटील, गणेश कड यांच्यासहीत अन्य कर्मचारी तेथे उपस्थीत होते. काही वेळाने तेथे लोकप्रतिनिधी व नागरीकही येत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT