Karpewadi human sacrifice case Judicial custody of three including with charmer sakal
सातारा

मांत्रिकासह तिघांना न्यायालयीन कोठडी

करपेवाडी नरबळीप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरूच; धागेदोरे कर्नाटकात

विकास खिलारी

मांत्रिकासह तिघांना न्यायालयीन कोठडी

ढेबेवाडी - करपेवाडी (ता. पाटण) येथील भाग्यश्री संतोष माने (वय १८) या महाविद्यालयीन युवतीची गुप्तधनाच्या आमिषाने गळा चिरून हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघांची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. या प्रकरणातील अन्य संशयित आजी व देवऋषीन महिलेलाही यापूर्वीच न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी काही संशयित असण्याची शक्यता असून, त्यांच्या शोधासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.

करपेवाडी येथील भाग्यश्री संतोष माने या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या झाल्याचे प्रकरण सुमारे साडेतीन वर्षांनंतर उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. हा नरबळीचा प्रकार असल्याचे पोलिस तपासातून समोर आले असून, भाग्यश्रीची आजी (आईची आई) रंजना लक्ष्मण साळुंखे (रा. तळमावले, ता. पाटण), स्थानिक देवऋषीन कमल आनंदा महापुरे (रा. खळे, ता. पाटण) यांच्यासह मांत्रिक फुलसिंग सेवू राठोड (रा. ऐनापूर तांडा विजापूर कर्नाटक), मांत्रिकाचा वाहनचालक विकास ऊर्फ विक्रम तोळाराम राठोड (रा. नऱ्हेगाव, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा. मुळेतांडा, ता. दक्षिण सोलापूर) आणि मोहनसिंग सीताराम नाईक (रा. महलतांडा, विजापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

यातील दोन संशयित महिलांना यापूर्वी न्यायालयीन कोठडी मिळाली होती. उर्वरित तिघांच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपल्याने पाटण न्यायालयात उभे केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान या प्रकरणात आणखी काही संशयित असण्याची शक्यता असून, या प्रकरणाचे धागेदोरे कर्नाटकापर्यंत पोचले असून, तपास सुरू ठेवला आहे. सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व टीम या प्रकरणी तपास करत आहे.

संशयितात निवृत्त शिक्षकाचा समावेश

या प्रकरणाचे कर्नाटक कनेक्शन दिवसेंदिवस अधिकच घट्ट बनत चालल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी कर्नाटकमधील मांत्रिकाला अटक केल्यानंतर लगेचच ज्या मोहनसिंगला अटक केली तो निवृत्त शिक्षक असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिक्षकासारखा सुशिक्षित व नवी पिढी घडविणारा घटक या प्रकरणाच्या तपासात समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT